मुंबई | बॉलिवूड अभिनेते आणि भारतीय जनता पार्टीचे माजी खासदार परेश रावल यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांनी स्वतः ट्वीट करुन यासंदर्भात माहिती दिली. परेश रावल यांनी शुक्रवारी सोशल मीडियावर हे ट्विट केलंय.
दुर्दैवाने, माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. त्यामुळे गेल्या दहा दिवसात माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी कृपया त्यांची कोरोना चाचणी करून घ्यावी, असं परेश रावल यांनी म्हटलं आहे. त्यांच्या या ट्विटनंतर अनेक चाहत्यांनी त्यांना लवकर बरं होण्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
परेश रावल यांनी काही दिवसांपूर्वी कोरोनाच्या लसीचा पहिला डोस घेतला होता. लस घेताना त्यांनी एक फोटोही सोशल मीडियावर शेअर केला होता. तसेच व्ही फॉर व्हॅक्सिन्! सर्व डॉक्टर, नर्स, फ्रंटलाईन वर्कर्स आणि शास्त्रज्ञांचा आभार, असं ट्विट परेश रावल यांनी केलं होतं.
दरम्यान, जगभरात आणि देशात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने कोरोना रुग्णांच्या संख्येत पुन्हा वाढ होत आहे. कोरोनाच्या पहिल्या लाटेतून वाचलेल्या कलाकारांना मात्र दुसऱ्या लाटेने चांगलाच धक्का दिलाय. त्यामुळे कोरोनाची दुसरी लाट बॉलिवूडकरांसाठी चिंतेची गोष्ट झाली आहे. यामध्येच बॉलिवूड अभिनेता अमिर खान, आर माधवन आणि मिलिंद सोमण यांना कोरोनाची लागण झालं असल्याचं समोर आलं आहे.
महत्वाच्या बातम्या-
आलिया भट्टच्या आईचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना सवाल, म्हणाल्या…
देवेंद्र फडणवीस यांच्यावर टांगती तलवार; फोन टॅपिंग प्रकरणात चौकशीची शक्यता
‘नियम फक्त सर्वसामान्यांसाठीच आहेत का?’; मनसे आमदार राजू पाटील यांचा संतप्त सवाल
छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेऊन सत्तेत आले, तरी…- चंद्रकांत पाटील
महावितरणाच्या अधिकाऱ्याला चप्पलीचा हार घालून खुर्चीला बांधलं; भाजप आमदाराचा कारनामा
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.