बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

भारतीय संघाच्या अडचणी वाढणार??, दुखापत असतानाही ‘हा’ खेळाडू खेळतोय आयपीएल!

मुंबई |  2020 ची उर्वरित आयपीएल सध्या चालू आहे. आयपीएलमुळे विश्वचषक अवघ्या काही दिवसांवर आला आहे हे कुठेतरी विसरत चालल्याचं दिसत आहे. कारण विश्वचषकासाठी जाहीर झालेल्या संघामधील खेळाडू दुखापत असतानाही आयपीएल खेळत असल्याचं समजत आहे. दुखापत वाढली तर महत्त्वाचा खेळाडू विश्वचषकाला मुकण्याची शक्यता आहे.

आयपीएलमधील कामगिरीच्या जोरावर मिस्ट्री स्पीनर वरूण चक्रवर्तीची भारताच्या संघात निवड झाली आहे. कोलकाता नाईट रायडर्स संघाकडून खेळणारा वरूण चक्रवर्ती मूळचा तामिळनाडूचा आहे. विश्वचषकाच्या संघात 10 ऑक्टोबरपर्यंत बदल होऊ शकतात. आयपीएलमधील कामगिरी पाहता वरूणला डच्चू देता येणार नाही, मात्र दुखापत वाढली तर त्याला संघातून वगळण्यात येऊ शकतं.

वरूण चक्रवर्तीच्या गुडघ्याला झालेली दुखापत ही पुर्णपणे बरी झालेली नाही त्यामुळे खेळताना त्याला त्रास होतो, अशी माहिती समजत आहे. मात्र दुखापत वाढली तर त्याला टी-20 च्या संघातून काढलं जाऊ शकतं. वरूण चक्रवर्ती टी-20 क्रिकेटसाठी महत्त्वाचा आहे त्यामुळे त्याला वगळलं तर संघाच्या अडचणींमध्ये वाढ होऊ शकते.

दरम्यान, 17 ऑक्टोबर ते 14 नोव्हेंबरपर्यंत विश्वचषकाचा थरार रंगणार आहे. भारत आणि पाकिस्तान या दोघांसह ग्रुप-2 मध्ये न्यूझीलंड आणि अफगाणिस्तान हे संघही आहेत. तसेच ग्रुप स्टेजमधून पात्र होणारे दोन संघही याच ग्रुपमध्ये येणार असून या सर्वांच्या सामन्याला 24 ऑक्टोबरपासून सुरुवात होणार आहे. विश्वचषकासाठी धोनीकडे बीसीसीआयने मोठी जबाबदारी दिली आहे. धोनी मेंटॉरच्या भूमिकेत संघासोबत असणार आहे.

थोडक्यात बातम्या- 

बाॅलिवूड स्टार ह्रतिक रोशनचा आर्यन खानला पाठिंबा, पोस्ट शेअर करत म्हणाला…

”या’ स्टारकास्टनंतर आता शाहरूखही एनसीबीच्या निशाण्यावर’; सरकारमधील ‘या’ मंत्र्याचं मोठं वक्तव्य!

‘सोमय्या भ्रष्टाचाराची तक्रार करायला निघाले तर त्यांना…’; शेलारांचा ठाकरे सरकारवर गंभीर आरोप

“आता राष्ट्रवादीवाले बाॅलिवूडची पण भांडी घासायला लागलेत”

‘CCTV तपासा, एनसीबीनेच ड्रग्ज ठेवलेत’; पार्टीमधील ‘या’ व्यक्तीचा खळबळजनक आरोप

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More