बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

नियतीचा क्रुर डाव! सकाळी वडील, संध्याकाळी आई, तासाभरात अभियंता मुलाचाही मृत्यू 

सांगली | कोरोनाचा विळखा दिवसंदिवस वाढतच जात आहे. कोरोनाने कित्येक कुटुंब उद्धवस्त केली आहेत. अशातच हृदय पिळवटून टाकणार एक घटना समोर आली आहे. सांगलीतील शिराळा तालुक्यातील शिरशी येथील झिमूर कुटुंबीयावर कोरोनानं घाला घातला आहे. अवघ्या 13 तासात संपूर्ण परिवार कोरोनानं हिरावून नेला.

सकाळी 5 वाजता वडील, संध्याकाळी 5 वाजता आई आणि लगेच सहा वाजता मुलगा असं 13 तासात कुटुंब उध्वस्त झालं आहे. तर आठ दिवसांपूर्वी चुलत भावाचं कोरोनामुळे निधन झालं होतं. त्यामुळे आठ दिवसात झिमुर कुटुंबातील चार जणांचा कोरोनाने बळी घेतला आहे. आई, वडील, मुलगा आणि पुतण्या असा चौघांचा मृत्यू झाल्यानं शिरशी गावासह पंचक्रोशीवर आभाळ कोसळलं आहे.

एकाच दिवशी इतके आघात झाल्याने शिरशी गावावर दुःखाचा डोंगर कोसळला. आठ दिवसांपूर्वी याच मुलाच्या चुलत भावाचे कोरोनामुळे निधन झाले होते. त्यामुळे आठ दिवसात झिमुर कुटुंबातील चार जणांचा कोरोनाने बळी घेतला. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे.

दरम्यान, इंजिनअर असलेला मुलगा 15 दिवसांआधी गावी आला होता. मात्र आपली आई आजारी असल्यामुळे त्याने गावी थांबण्याचा निर्णय घेतला. आईला कोरोनाची लागण झाली त्यानंतर काही वडीलांनाही कोरोनाची लागण झाली. दोघांवर उपचार चालू होते दोघांच्याही प्रकृतीत सुधारणा झाली होती परंतू परत त्यांची प्रकृती खालावली आणि या दरम्यानच इंजिनीअर मुलालाही कोरोनाने गाठलं आणि आपलं शिकार बनवलं.

थोडक्यात बातम्या- 

‘सध्या ही वेळ नाही पण माझा शब्द खरा करून दाखवणार’; फडणवीसांचा ठाकरे सरकारला इशारा

मोठी बातमी! महाराष्ट्रात रेल्वेने येणाऱ्या प्रवाशांसाठी नवी नियमावली जाहीर; ‘या’ नियमांचं करावं लागणार पालन

“खतांच्या दरवाढीबद्दल तक्रार करणाऱ्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी मोदींचे मनापासून आभार मानावेत”

दिलासादायक! मुंबईची कोरोनामुक्तीकडे आगेकुच; सक्रिय रूग्णसंख्येत लक्षणीय घट

आनंदाची बातमी! पुण्यात आज नवीन रुग्णांपेक्षा कोरोनामुक्त रूग्णांची संख्या जास्त

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More