‘…म्हणून हिंदुंनी 5-5 मुलांना जन्म द्यायला हवा’; देवकीनंदन यांचं वक्तव्य चर्चेत

Devakinandan Thakur | गेल्या काही दिवसांआधी देशात मुस्लिम बांधवांच्या लोकसंख्येत वाढ झाली असल्याची बातमी समोर आली होती. याच पार्श्वभूमीर देवकीनंदन ठाकूर यांनी हिंदुंना 5-5 मुलांना जन्म देण्याचा सल्ला दिला आहे. यावर देवकीनंदन (Devakinandan Thakur) म्हणाले की, सर्व कायदे हिंदुंसाठी केलेत का?, असा सवाल त्यांनी केला. वक्फ बोर्डाप्रमाणे देशात सनातन बोर्डही असावx. देशात लोकसंख्या नियंत्रण कायदा असावा, असं त्यांनी म्हटलंय.

देवकीनंदन यांनी कुटुंब नियोजनावर भाष्य केलं

देवकीनंदन (Devakinandan Thakur) यांनी कुटुंब नियोजनावर भाष्य केलं. आपण एकट्याने केवळ कुटुंब नियोजन करावे आणि इतरांनी कुटुंब वाढवलं पाहिजे, असं त्यांनी म्हटलंय.

मी लोकसंख्या नियंत्रणासाठी याचिका दाखल केली आहे. आता आपण दीडशे कोटींवर गेलो आहोत. मात्र हा कायदा होईपर्यंत हिंदुंना लोकसंख्या तरी वाढवता येतील. सनातनांना निदान मुलं तरी होतील. आम्हाला एकच पत्नी ठेवण्याचा अधिकार असेल तर प्रत्येकाला एकच पत्नी ठेवण्याचा अधिकार द्या. जर आपल्याला एक मूल असेल तर प्रत्येकाला दोन मुले असावीत, असंही ते म्हणालेत.

देवकीनंदन यांनी सनातन बोर्डाची मागणी केली

देवकीनंदन ठाकूर (Devakinandan Thakur) यांनी पुढे वक्फ बोर्डाप्रमाणे सनातन बोर्डाची मागणी केली. वक्फ बोर्डाला जे अधिकार दिले आहेत तेच सनातन बोर्डालाही अधिकार मिळावा, अशी सनातन बोर्डाची मागणी आहे. तसेच मथुरेतील कृष्णजन्मभूमीवर देखील भाष्य केलं आहे.

मथुरा येथे श्रीकृष्णजन्मभूमीवर पाठिंबा देण्याचं आवाहन देवकीनंदन शास्त्री यांनी केलं आहे. मंदीर उभारणीला सर्व विरोधी पक्षनेत्यांनी पाठिंबा दिल्यास आम्ही पाठिंबा देऊ, असं देवकीनंदन ठाकूर (Devakinandan Thakur) म्हणाले आहेत.

News Title – Devakinandan Thakur Big Statement About Hindus Religion Population

महत्त्वाच्या बातम्या

‘…नाहीतर मी मुख्यमंत्री झालो असतो’; छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट

पुणे हादरलं! बड्या उद्योगपतीच्या 17 वर्षाच्या मुलाने भरधाव कारने दोघांना चिरडलं

जान्हवी कपूरने सांगितली धक्कादायक घटना; संपूर्ण बॉलिवूड हादरलं

‘अशा’ व्यक्तींपासून होईल तितकं दूर राहा; आयुष्यात खूप पुढे जाल

“सगळी पदं दिली, आणखी काय हवं होतं?”, शरद पवारांचं अजित पवारांना उत्तर