नातवाची उमेदवारी जाहीर करताना देवेगौडांना रडू कोसळले

बंगळुरु |  माजी पंतप्रधान एच.डी.देवेगौडा यांनी त्यांच्या नातवाला राजकारणाच्या आखाड्यात उतरवत असल्याचं जाहीर केलं. मात्र ही घोषणा करत असताना ते मंचावरच रडत होते.

देवेगौडा यांचा नातू प्रज्वल रेवण्णा हे हासन लोकसभा मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहे. जनता दल सेक्युलरकडून त्यांना या मतदारसंघाची उमेदवारी देण्यात येणार आहे.

तुमच्या सगळ्यांच्या आशिर्वादाने मी प्रज्वलला निवडले असल्याचं देवेगौडा यांनी जाहीर केलं. मात्र हे करत असताना त्यांच्या डोळ्यातून अश्रू वहात होते

आपल्या आजोबाचे रडणे पाहून नातू प्रज्वल रेवण्णा यालाही रडू कोसळले.

महत्वाच्या बातम्या-

लोकसभेसाठी काँग्रेसची दुसरी यादी जाहीर; पाहा महाराष्ट्रात कोण कुठून लढणार?

हिंमत असेल तर मोदींनी पश्चिम बंगालमधून निवडणूक लढवावी- ममता बॅनर्जी

-“इम्रान खान इतकेच उदार आहेत तर मसूद अजहरला भारताकडे सोपवावं”

-चंद्रशेखर आझाद यांना भेटण्यासाठी प्रियांका गांधी रुग्णालयात

राजू शेट्टींची आघाडी सोबत हातमिळवणी; दोन जागा मिळण्याची शक्यता