Top News महाराष्ट्र मुंबई

ठाकरे सरकारच्या ‘या’ निर्णयाचा सामान्य ग्राहकांना कोणताही लाभ नाही- देवेंद्र फडणवीस

मुंबई | ठाकरे सरकारने बांधकाम प्रकल्पांना सर्व प्रीमियमवर 50 टक्के सूट देण्याचा निर्णयावर भाजपने विरोध केला आहे. या निर्णयावरून भाजप नेते आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सरकारवर निशाणा साधला आहे.

बांधकाम प्रकल्पांना सर्व प्रीमियमवर 50 टक्के सूट देण्याचा निर्णय हा केवळ विकासकांना डोळ्यांपुढे ठेवून घेण्यात आला असून, त्यामुळे सामान्य ग्राहकांना कुठलाही लाभ मिळणार नाही, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

प्रीमियम कमी करायचे असतील आणि त्याचा फायदा प्रत्यक्ष जनतेला द्यायचा असेल तर यासाठी रेराच्या यंत्रणेचा उपयोग करायला हवा आणि त्यांच्या माध्यमातून हा फायदा प्रत्यक्ष ग्राहकाला मिळतोय, हे सुनिश्चित केलं पाहिजे पण सरकारने तसं न केल्याने या निर्णयाचा फायदा केवळ विकासकाला होईल, असं फडणवीस म्हणाले.

दरम्यान, मुंबईकर कर भरत असले तरी ठाकरे सरकारला टक्केवारी मात्र बिल्डर देतात. निर्लज्ज सरकार, अशा शब्दात भाजप नेते अतुल भातखळकर यांनी म्हटलं आहे.

थोडक्यात बातम्या-

अहो दादा, असं मुघलांसारखं काय बोलता?- अमोल मिटकरी

“मुंबईकर टॅक्स भरत असले तरी ठाकरे सरकारला टक्केवारी मात्र बिल्डर देतात”

राज्य सरकारच्या ‘त्या’ चुकीमुळे शेतकऱ्यांचं नुकसान होत आहे- रावसाहेब दानवे

विधान परिषद निवडणुकीत गैरप्रकार झाला, मतदान EVM मशीनवर घ्या- चंद्रकांत पाटील

“दादा बंगालचा वाघ, भाजपमध्ये आल्यास त्याचं नक्कीच स्वागत करु”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या