‘नदी बचाव’च्या जाहिरातीत मुख्यमंत्र्यांचा पत्नीसोबत अभिनय

मुंबई | मुंबईतील नदी बचाव मोहिमेच्या जाहिरातीमध्ये चक्क राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अभिनय केलाय. त्यांच्यासोबत त्यांच्या पत्नी अमृता फडणवीसही झळकल्या आहेत. 

संगिता मांजरेकर आणि लिला एन्टरटेन्मेंट यांनी या गाण्याची निर्मिती केलीय. यूट्यूबवर हे गाणे नुकतेच प्रदर्शित करण्यात आले आहे. 

श्री आणि सौ फडणवीस यांच्यासोबतच अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, मुंबई महापालिकेचे आयुक्त अजॉय मेहता आणि मुंबई पोलीस आयुक्त दत्ता पडसलगीकर हेही या गाण्यामध्ये झळकले आहे. सोनू निगम आणि अमृता फडणवीस यांनी हे गाणं गायलं आहे. 

पाहा गाणं-