बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

पंतप्रधानांसोबतच्या भेटीसाठी मुख्यमंत्र्यांनी आम्हाला नेलं असतं तर….- देवेंद्र फडणवीस

मुंबई | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली एक शिष्टमंडळाने पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली. त्यानंतर मुख्यमंत्री आणि पंतप्रधान यांच्यात बंद दाराआड चर्चा झाली. यावरून राजकीय वर्तुळा अनेक चर्चांणा उधाण आलं आहे. याच पार्श्वभूमीवर विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

पंतप्रधानांसोबतच्या भेटीसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आम्हाला नेलं असतं तर आनंदच झाला असता, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. मुख्यमंत्री-पंतप्रधान यांच्या भेटीनंतर पत्रकार परिषेदत फडणवीस बोलत होते.

मोदी आणि ठाकरे यांची व्यक्तिगत भेट झाली की नाही मला माहीत नाही. झाली असेल तर चांगलेच आहे. आम्ही त्याचे स्वागत करतो. अशा भेटीमुळे राज्याला फायदाच होईल, असं सांगतानाच मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली कोणतंही शिष्टमंडळ जेव्हा पंतप्रधानांना भेटायलं जातं. तेव्हा शिष्टमंडळाशी चर्चा केल्यानंतर पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांमध्ये एकांतात चर्चा होते, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

दरम्यान, महाराष्ट्राच्या हाती असलेल्या विषयांपेक्षा केंद्राकडे असलेल्या विषयांवर पाठपुरावा केला तर बरे होईल. केंद्र सरकारकडून आवश्यक ती मदत महाराष्ट्राला मिळत असल्याचं फडणवीस यांनी म्हटलं आहे.

थोडक्यात बातम्या- 

ठाकरे आणि मोदी भेटतात तेव्हा चर्चा तर होणारच- संजय राऊत

“अमरावतीची जनता पुन्हा तुम्हाला रिटेकची संधी देणार नाही, खासदारकीचा राजीनामा द्यावा”

‘पंतप्रधानांना भेटण्यापूर्वी मुख्यमंत्र्यांनी…’; मोदी आणि मुख्यमंत्री ठाकरेंच्या भेटीवर उदयनराजेंचं मोठं वक्तव्य

व्हायरल व्हिडीओमुळं प्रसिद्ध झालेल्या ‘बाबा का ढाबा’मध्ये पुन्हा शुकशुकाट?, रेस्टॉरंट बंद करण्याची आली वेळ

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More