Top News महाराष्ट्र सिंधुदुर्ग

राणे महाराष्ट्राचे दबंग नेते, झोप विसरून मेहनत करतात- देवेंद्र फडणवीस

सिंधुदुर्ग | माजी मुख्यमंत्री नारायण राणे हे महाराष्ट्राचे दबंग नेते आहेत. झोप विसरून ते मेहनत करतात. आज मेडिकल कॉलेजच्या निमित्ताने त्यांची स्वप्नपूर्ती होत आहे, असं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

सिंधुदुर्ग येथे नारायण राणे यांच्या मेडिकल कॉलेजचं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं. यावेळी देवेंद्र फडणवीस बोलत होते

महाराष्ट्राचे दबंग नेता म्हणून नारायण राणे यांची ख्याती आहे. अनेक लोकं स्वप्न पाहतात. स्वप्न पाहणं हे सोपं असतं. पण स्वप्न पाहिल्यानंतर आपली झोप विसरून ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी मेहनत करतात, असे लोक कमी असतात. त्यामधील नारायण राणे हे एक आहेत, असं म्हणत फडणवीसांनी राणेंचं कौतुक केलं.

दरम्यान, मी स्वत: अतिशय जवळून राणेंचा संघर्ष बघितलाय. मेडिकल कॉलेज उभारताना अनेक अडचणी आल्या. इतके इन्स्पेक्शन होतात.या सगळ्या गोष्टींना सामोरे जात त्यांनी सगळा पाठपुरावा केला. अखेर या मेडिकल कॉलेजचं उद्घाटन झालं, असंही फडणवीस म्हणाले.

थोडक्यात बातम्या-

‘किती चाटूकरिता कराल मुस्लिम मतांसाठी?’; अतुल भातखळकरांची पवारांवर टीका

“कार्यालयात काम सोडून केस विंचरत बसणं हे गंभीर गैरवर्तन आहे”

कधीकाळी कोहलीसाठी केलेल्या त्या ट्विटमुळं अमिताभ बच्चन यांच्यावर ओढवली नामुष्की!

…म्हणून माझ्यासोबत हे सारं घडतंय; स्वत:च्या गावात धनंजय मुंडे भावुक

“मातृभाषेत शिक्षण देणारं वैद्यकीय, तांत्रिक महाविद्यालय प्रत्येक राज्यात असावं”

उत्तराखंडमध्ये हिमकडा कोसळला, जोशीमठ धरण फुटल्याने अनेकजण वाहुन गेल्याची भिती

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या