बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

…अशाने आकडेवारी कमी होईल पण धोका अधिक वाढेल- देवेंद्र फडणवीस

मुंबई |  दिवसेंदिवस कोरोनाबाधित रूग्णांची संख्या वाढत चालली आहे. आता काही प्रमाणात मृत्यूदर कमी होत चालला आहे. मात्र हा मृत्यूदर कमी होत नसून कोरोनाग्रस्तांच्या मृत्यूचं अन्य कारण नोंद होतो आहे, असा गंभीर आरोप विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर केला आहे.

मुंबईत बऱ्याच रूग्णालयात रूग्णाची नोंद ही कोरोना संशयित म्हणून केली जात असून त्यांची टेस्टही केली जात नाहीये. त्याचबरोबर कोरोनाग्रस्तांच्या मृत्यूचं अन्य कारण सांगून त्यांच्या मृतदेहांची विल्हेवाट लावली जात असल्याचा आरोप फडणवीसांनी केला आहे.

100 च्यावर अशा केसेस आहेत ज्याठिकाणी पेशंट अ‌ॅडमिट झाल्यानंतर सस्पेक्टेड कोविड लिहिलेलं आहे, आयसोलेशन वॉर्डमध्ये रूग्णाला दाखल करून घेण्याची सूचना केलेली आहे. त्यांच्या घशाच्या स्त्राव घेण्यास सांगितलेलं आहे. परंतू घशाचा स्त्राव घेऊन चाचणी करण्यात येत नाहीत, असा आरोप फडणवीसांनी केला आहे.

एका पेशंटच्या केसमध्ये तर 4 दिवस चाचणी करण्यात आलेली नव्हती. चार दिवसांनी तो रूग्ण मृत्यूमुखी पडल्यानंतर प्रशासनाने त्यावर संशयित कोरोना म्हणून त्यांचा मृतदेह त्यांच्या कुटुंबियांच्या हवाली केला. यामुळे अनेक प्रश्न तयार होतायेत. अशाने आकडेवारी कमी होण्यास मदत होईल पण धोका अधिक वाढेल, असं फडणवीस म्हणाले.

ट्रेंडिंग बातम्या-

सरकारी कर्मचाऱ्यांना एप्रिलचा पगार एकरकमी मिळणार; राज्य सरकारचा निर्णय

‘…तर मी आत्महत्या करेन’; नसीरूद्दीन शाह यांचं धक्कादायक वक्तव्य

महत्वाच्या बातम्या-

बिल गेट्स यांच्याकडून नरेंद्र मोदींचं कौतुक, म्हणाले…

ट्रोलर्सची भाषा बघून आपण माणसात राहतोय की जनावरांच्या टोळ्यात? हेच कळत नाही- चित्रा वाघ

राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा 5649 वर

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More