बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘आपली साथ यापुढेसुद्धा अशीच राहू द्या’… संभाजीराजेंनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

मुंबई |  खासदार संभाजीराजे भोसले यांनी मुख्यमंत्री देेवेंद्र फडणवीस यांची भेट घेत राज्य सरकार मराठा आरक्षणाच्या बाजूने खंबीरपणे उभा राहिल्याबद्दल त्यांचे आभार मानले आहेत. ट्वीटरवरून संभाजीराजेंनी ही माहिती दिली आहे.

आज (रविवारी) संभाजीराजेंनी मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेतली. मराठा आरक्षणासाठी झुंझारपणे लढणाऱ्या वकिलांची फौज राज्य सरकारने उभी केली होती. या सगळ्यांच्या युक्तिवादामुळेच आरक्षण कोर्टात टिकायला मदत झाली. संभाजीराजेंनी या सगळ्याबद्दल मुख्यमंत्र्यांचे आभार मानले.

जर मराठा आरक्षणाला कुणी उच्च न्यायालयात आव्हान दिलं तर पुढील प्लॅनदेखील या भेटीत ठरला असल्याची माहिती आहे.

दरम्यान, राज्य सरकार यापुढील काळात देखील मराठा समाजाच्या पाठिशी खंबीरपणे उभा राहिल, असं आश्वासन मुख्यमंत्री फडणवीसांनी संभाजीराजेंना दिलं.

महत्वाच्या बातम्या-

-महाराष्ट्रातील ‘या’ नेत्याच्या गळ्यात पडणार काँग्रेस अध्यक्षपदाची माळ??

खासदार नुसरत यांच्या सिंदूर लावण्याने वाद

-काँग्रेसकडून हे 2 बडे नेते करणार वंचित बहुजन आघाडीशी चर्चा; तोडगा निघणार??

-शाहू महाराजांनंतर देवेंद्र फडणवीसांनीच मराठा समाजासाठी कामं केलं- मेटे

-‘अल्लाहने दाखवलेल्या रस्त्यापासून मी भटकले होते’ म्हणत या अभिनेत्रीने घेतला 18 व्या वर्षी संन्यास

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More