बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘संजय राऊतांना आता तरी समज यायला हवी’, फडणवीसांची तुफान टोलेबाजी

मुंबई | शिवसेना (Shivsena) आणि भाजप (BJP) पक्षात सध्या शाब्दिक युद्ध सुरु आहे. शिवसेनेचे नेते व खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी भाजपने चोऱ्या करुन सरकार स्थापन केले, असे आरोप लावले आहेत. तर देवेंद्र फडणवीसांना त्यांनी माझ्यावर कोणतीही कारवाई करा, मी घाबरत नाही, असे आव्हान केले आहे. संजय राऊतांच्या टीकेला आता फडणवीसांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

विरोधकांचं कामच असते टीका करणं. त्यांच्या असंवेदनशिलतेमुळे त्यांच्यावर आणि राज्यावर ही परिस्थिती आली आहे. आम्ही परिस्थिती सुधारण्याचा प्रयत्न करत आहोत. संजय राऊतांना आता तरी समज यायला हवी. त्यांनी पक्षाची काय अवस्था करुन ठेवली आहे?, असं फडणवीस म्हणाले. तर तुम्ही मला त्यांच्याबद्दल का विचारता? सेन्सिबल माणसांबद्दल विचारा, असं म्हणत फडणवीसांनी राऊतांना टोला लगावला आहे.

फडणवीस आज सकाळी दिल्लीसाठी रवाना झाले. गेल्या पंधरवड्यातील हा त्यांचा तिसरा दौरा आहे. यापूर्वी ते महाराष्ट्राच्या मंत्रीमंडळ विस्ताराच्या बैठकीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या समवेत दोनदा दिल्लीला गेले होते. मात्र, यावेळी ते दिल्लीत एकनाथ शिंदेे यांना घेऊन गेले नाहीत. ते एकटेच गेले आहेत. दिल्लीत पत्रकारांसोबत बोलताना फडणवीसांनी संजय राऊत यांना टोला लगावला.

दरम्यान, फडणवीस या दौऱ्यात भाजपच्या अनेक बड्या नेत्यांना भेटणार असल्याचे वृत्त आहे. त्यात ते महाराष्ट्राच्या खातेवाटपाची चर्चा करणार आहेत. खाते वाटपावर त्यांनी पक्षाच्या कालच्या (दि. 23) कार्यक्रमात भाष्य केले होते. युतीचे सरकार असल्याने कोणीही खात्यांची अपेक्षा ठेऊ नये, असे ते म्हणाले होते.

थोडक्यात बातम्या –

मुलीच्या चारित्र्यावर प्रहार, संतप्त स्मृती इराणींचा काँग्रेसला थेट इशारा

शिवसेनेपाठोपाठ राष्ट्रवादी आणि काँग्रेसला धक्का, निष्ठावंत आमदार शिंदे गटात जाण्यासाठी उत्सुक

‘मनसे म्हणजे एका आमदाराची अगरबत्ती’, दीपाली सय्यद यांनी मनसेला पुन्हा डिवचलं

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची मुंबईकरांसाठी सर्वात मोठी घोषणा!

‘घटना सर्वांसाठी सारखीच’, संजय राऊतांचा शिंदे सरकारला इशारा

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More