Top News महाराष्ट्र मुंबई

‘देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील यांच्यासह भाजप नेत्यांच्या सुरक्षा व्यवस्थेत कपात’; ठाकरे सरकारचा मोठा निर्णय

मुंबई | राज्य सरकारने राज्यातील विरोधी पक्ष भाजपमधील नेत्यांची सुरक्षाव्यवस्था कपात करण्याचा मोठा निर्णय घेतला असल्याचं समजंत आहे. दोन दिवसांपूर्वी झालेल्या उच्चपदस्थ अधिकाऱ्यांच्या बैठकीनंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.

यामध्ये भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, आमदार राम कदम, केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे आणि इत्यादी नेत्यांचा समावेश असल्याची माहिती आहे.

देवेंद्र फडणवीस यांच्या ताफ्यातील बुलेटप्रुफ वाहन काढण्यात आलं आहे. भाजपाच्या चंद्रकांत पाटील, प्रसाद लाड, कृपाशंकर सिंह यांची सुरक्षा काढण्यात आली आहे.

दरम्यान, राज्यात सत्तांतर झाल्यानंतर पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या सुरक्षेत वाढ करत त्यांना वाय दर्जावरून झेड दर्जाची सुरक्षा देण्यात आली आहे.

थोडक्यात बातम्या-

अभिनेत्री भाग्यश्री मोटेचा हाॅट अंदाज; चाहत्यांकडून लाईक्स आणि कमेंटचा पाऊस

ऑस्ट्रेलियन चाहत्यांकडून पुन्हा वर्णद्वेषी टीका, खेळ थांबवण्याची आली वेळ, पहा व्हिडीयो

सेक्स पोजिशन ट्राय करण्याच्या नादात तरुणाचा मृत्यू प्रकरणाला वेगळं वळण

एका बायकोवरुन दोन जणांच्या गटात तुफान हाणामारी; सहा जणांना अटक

भंडाऱ्यातील घटनेने पाकिस्तानी गोलंदाज शोएब अख्तरही हळहळला; म्हणाला…

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या