“स्वत:च्या काकांशी प्रामाणिक राहिला असता तर दुसऱ्यांच्या काकाची सुपारी घ्यायची वेळ आली नसती”

मुंबई | स्वत:च्या काकांशी प्रामाणिक राहिला असता तर दुसऱ्यांच्या काकाची सुपारी घ्यायची वेळ आली नसती, असं म्हणत  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंवर निशाणा साधला आहे.

मनसेचा ‘उनसे’ असा उल्लेख करत राज ठाकरेंचं दुकान बंद झालं आहे, असा टोला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज ठाकरेंना लगावला आहे. ते साम टीव्हीला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते.

राज ठाकरे जिथे जिथे सभा घेत आहेत तिथे भाजपच निवडून येणार असल्याचा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. यावेळी त्यांनी आघाडीवरही जोरदार टीकास्त्र सोडलं.

राज ठाकरेंची तोफ आज कोल्हापुरात धडाडणार असून राज ठाकरे मुख्यमंत्र्यांच्या टीकेला काय उत्तर देणार याकडे सगळ्याचं लक्ष आहे.

महत्त्वाच्या बातम्या

-तुम्ही कितीही डाव खेळा, पण मी तुमचा बाप आहे- एकनाथ खडसे

-राज ठाकरेंची सभा म्हणजे ‘टुरिंग टॉकिज’चा शो; तावडेंचा पुन्हा राज ठाकरेंवर निशाणा

-शाळकरी मुली म्हणतात, ताई आपली हक्काची!

-घराच्या तुळईवर लिहून ठेवा, नरेंद्र मोदी पंतप्रधान होणार नाहीत- राजू शेट्टी

-देशात मोदींना दुसरा पर्याय नाही म्हणूनच आम्ही युती केली- आदित्य ठाकरे