मुख्यमंत्री फडणवीस म्हणतात, पवार साहेब हे वागणं बरं नव्हं…!

मुंबई | एखाद्याच्या मृत्यूनंतर त्यांच्याबद्दल अशी टीका करणं अयोग्य आहे, असं म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला आहे.

राफेल खरेदीचा व्यवहार अमान्य असल्याने दिवंगत मनोहर पर्रिकर यांनी राजीनामा दिला आणि ते गोव्यामध्ये परतले, असं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी केलं होतं.

याआधीही राहुल गांधींनी असचं काहीसं बोलण्याचा प्रयत्न केला होता. पण तेव्हा पर्रिकर जिवंत होते आणि त्यांनी राहुल गांधीना योग्य उत्तर दिलं होतं. पण त्यांच्या मृत्युनंतर त्यांच्यावर टीका करणं अयोग्य आहे, असं मुख्यमंत्र्यानी म्हटलं आहे.

दरम्यान, पर्रिकरांच्या मृत्यूनंतर राजकीय फायद्यासाठी त्यांचा वापर करणं योग्य नसल्याचं फडणवीसांनी म्हटलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या

-आढळराव पडले दिल्लीत भारी; पंतप्रधान मोदींनी केलं तोंडभरून कौतुक

-बारामतीत आता मोदींचं नव्हे तर अमित शहांचं वादळ येणार! तारीख ठरली

-काँग्रेसला चांगली अद्दल घडवा; नरेंद्र मोदींचा घणाघात

-बटलर आला आणि मुंबईला असा तडाखा देऊन गेला की बास रे बास!

-पार्थ पवारांना दिलासा; या 2 माजी नगरसेवकांनी केला राष्ट्रवादीत प्रवेश