Top News महाराष्ट्र मुंबई

‘अवघ्या सात तासाच्या अधिवेशनात जनतेचे प्रश्न कसे मांडायचे?’; फडणवीसांचा सरकारला सवाल

मुंबई | उद्या म्हणजेच 14 डिसेंबर आणि 15 डिसेंबरला हिवाळी अधिवेशन घेतलं जाणार आहे. अधिवेशनाला दोनच दिवसांचा कालावधी मिळणार आहे. याच पार्श्वभूमीवर भाजप नेते आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर टीका केली आहे.

कोरोनासोबतच इतर बाबतीतही अपयशी ठरलेलं महाविकास आघाडी सरकार हिवाळी अधिवेशनही अवघ्या सात तासांचं घेत आहे याला काही अर्थ नाही. कारण जनतेचे अवघ्या सात तासाच्या अधिवेशनात प्रश्न कसे मांडायचे, असा सवाल फडणवीसांनी केला आहे. पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते.

सरकार वाढीव वीज बिलांबाबतही घूमजाव करत आहे. कोल्हापूरमध्ये वाहून गेलेल्या घरालाही अडीच हजारांचं बिलं पाठवण्यात आलं आहे. यावरूनच सगळ्या गोष्टी लक्षात येत असल्याचं फडणवीस यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, कोरोनाच्या काळात झालेला भ्रष्टाचार हा मन विषण्ण करणारा आहे. मुख्यमंत्री म्हणतात कोरोनाची लाट थोपवण्यात आम्ही यशस्वी झालो म्हणतात पण सर्वात जास्त कोरोना मृत्युंची नोंद महाराष्ट्रात झाली आहे. मात्र तरीही हे सरकार का आपली पाठ थोपटून घेत आहे?, असं फडणवीस म्हणाले.

थोडक्यात बातम्या-

…तर मुंबईत महापौर भाजपचा आणि उपमहापौर आरपीआयचा- रामदाल आठवले

“मन खचून गेले हे बघून….त्या महाराष्ट्रामध्ये ही परिस्थिती बघायला मिळत”

कोरोनाने रायकर कुटुंबाचा केला पुन्हा घात; कुटुंबातील या व्यक्तिचं निधन

ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लावाल तर याद राखा; फडणवीसांचा सरकारला इशारा

“उद्धव ठाकरे म्हणतात 25 वर्षे आम्ही सत्तेत राहू, मग आम्ही काय करायचं”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या