बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“कोण होतास तू काय झालास तू, अरे वेड्या असा कसा वाया गेलास तू”

मुंबई | त्रिपुरा येथील कथीत हिंसाचाराच्या घटनेनंतर त्याचे पडसाद महाराष्ट्रात अनेक ठिकाणी पाहायला मिळाले. या घटनेनंतर राज्यात मालेगाव आणि अमरावती येथे देखील हिंसाचाराची घटना घडली. या घटनेवरून आता राजकारण रंगत आहे. अमरावतीत घडलेल्या हिंसाचारानंतर भाजप आणि महाविकास आघाडी सरकारमध्ये आरोपांच्या फैरी झाडल्या जात आहेत.

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपची कार्यकारणी बैठक मंगळवारी पार पडली. यावेळी अमरावतीत घडलेल्या हिंसाचाराचा मुद्दा लावून धरत देवेंद्र फडणवीसांनी शिवसेना खासदार संजय राऊत आणि राज्यात सत्तेवर असलेल्या महाविकास आघाडी सरकारवर टीकेची झो़ड उठवली आहे. सरकारच्या नेत्यांची तोंडं शिवली गेली होती का? म्हणत फडणवीसांनी जोरदार हल्लाबोल केला आहे.

त्रिपुरामध्ये काय घडलं याची राहुल गांधींना कल्पना होती. तिथे मशिद, कुराण जाळले नाही, ना कोणाला दुखापत झाली नाही. राहुल गांधींनी 9 तारखेला ट्विट केलं आणि 11 तारखेला मालेगावात हजारोंच्या संख्येने मोर्चे कसे निघाले?, असा सवाल उपस्थित करत निवडून निवडून हिंदुचे दुकानं जाळले, सरकारच्या समर्थनाने हे मोर्चे निघाले असल्याचा घणाघात देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.

हिंदुंचे दुकानं जाळले तेव्हा हिंदु, मुसलमान कोणाचे का दुकान असेना ते जाळणे चुकीचे असं सरकारकारमधील एकही नेता का बोलला नाही? असा परखड सवाल फडणवीसांनी विचारला. तर ‘मला संजय राऊत यांचं आश्चर्य वाटतं. एक गाणं होतं कोण होतास तू काय झालास तू, अरे वेड्या असा कसा वाया गेलास तू,’ असं म्हणत फडणवीसांनी राऊतांवर निशाणा साधला आहे.

थोडक्यात बातम्या-

“आजारी मुख्यमंत्री, आजारी सरकार अशी या सरकारची अवस्था”

‘पद्म पुरस्कार येत आहे’; विक्रम गोखलेंच्या ‘त्या’ वक्तव्यावरून बॉलिवूड अभिनेत्रीने साधला निशाणा

” उद्धव ठाकरे तर पार्टटाईम मुख्यमंत्री, फडणवीसांसारखा फुलटाईम मुख्यमंत्री हवा “

हार्दिक पांड्या म्हणतो, ‘जप्त केलेलं ते घड्याळ 5 कोटींचं नाही तर फक्त…’

“पेशंट मरत असेल, तेव्हाही तुम्ही त्याला भगव्याचं रक्तचं देणार का?”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More