बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“ते आले तर नाव महाराजांचे घेतील आणि काम मुघलांचे करतील”

मुंबई | भाजप खासदार मोहन डेलकर यांच्या आत्महत्येनंतर दादरा व नगर हवेली लोकसभा मतदारसंघाची पोटनिवडणुक जाहिर करण्यात आली. निवडणूक जाहीर होताच आता पोटनिवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी पाहायला मिळत आहे. राज्यातील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आता प्रचाराच्या मैदानात उतरले आहेत. भाजप उमेदवाराचा प्रचार करताना फडणवीसांनी शिवसेनेवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

शिवसेनेने दिवंगत खासदार मोहन डेलकर यांच्या पत्नी कलाबेन डेलकर यांनाच त्यांचा उमेदवार म्हणून जाहिर केलं आहे. तर भाजपकडून महेश गावित यांना उमेदवारी देण्यात आली आहे. महेश गावित यांच्या प्रचारासाठी देवेंद्र फडणवीसांनी सभा घेतली. या सभेत बोलताना फडणवीसांनी शिवसेनेवर टीकेची तोफ डागली आहे. शिवसेना संधीसाधू असून दादरा-नगर हवेलीत मृत्यूच्या लाटेचं राजकारण करत असल्याचा आरोपही फडणवीसांनी केला आहे.

शिवसेनेनं पंतप्रधान मोदींच्या नावावर 56 जागा मिळवल्या आणि काँग्रेस, राष्ट्रवादीसोबत गेले, अशी टीकाही फडणवीसांनी केली आहे. महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकार खंडणीखोर असल्याचा आरोप करत ते तुम्हाला इथे हवे आहेत का? अशी विचारणाही फडणवीसांनी केली. जर ते इथे आले तर नाव महाराजांचे घेतील आणि काम मुघलांचे करतील, अशी जळजळीत टीकाही फडणवीसांनी शिवसेनेवर केली आहे.

खासदार मोहन डेलकर यांनी 22 फेब्रुवारी रोजी मुंबईतील सी ग्रीन हॉटेलमध्ये आत्महत्या केली होती. त्यांच्या निधनाने रिक्त झालेल्या दादरा व नगर हवेली लोकसभा मतदारसंघ जिंकण्यासाठी भाजप आणि शिवसेनेत चुरस पाहायला मिळत आहे. शिवसेनेने मोहन डेलकर यांच्या पत्नीलाच मैदानात उतरवल्याने आता दादरा-नगर हवेलीत कोण बाजी मारणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

 

थोडक्यात बातम्या-

समीर वानखेडेंचा आणखी एक जुना फोटो शेअर करत मलिक म्हणतात, मला तर…

“आर्यन खानला फसवण्यात आलं असून, समीर वानखेडेंची नोकरी जाणार”

समीर वानखेडेंवर पाळत ठेवण्यात येत असल्याच्या आरोपावर मुंबई पोलिसांचं स्पष्टीकरण, म्हणाले…

दिवाळीसंदर्भातील नियमावली जाहीर; ‘या’ नियमांचं करावं लागणार पालन

पेट्रोल-डिझेलच्या किंमतीमध्ये वाढ, वाचा आजचे ताजे दर

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More