कोणते पक्ष रिकामे होतात ते येणाऱ्या काळात समजेल – देवेंद्र फडणवीस

मुंबई | कोणते पक्ष रिकामे होतात ते येणाऱ्या काळात समजेल, असा टोला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांना लगावला आहे. ते एका कार्यक्रमात बोलत होते. 

पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे निकाल लागल्यानंतर अजित पवार यांनी भाजपचे अनेक आमदार, खासदार आणि नेते आमच्या संपर्कात असल्याचं म्हटलं होतं. त्यामुळं भाजपात गेेलेले राष्ट्रवादीचे नेते पुन्हा राष्ट्रवादीत जाणार अशा चर्चा सुरु होत्या.

मुख्यमत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोणते पक्ष रिकामे होतात ते पहा, असा इशारा दिल्यानं राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचे कोणते नेते भाजपमध्ये प्रवेश करणार, अशा चर्चा सुरु झाल्या आहेत.

दरम्यान, पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांमध्ये विजय मिळाल्यानं विरोधी पक्षांमध्ये उत्साह संचारला आहे.

महत्वाच्या बातम्या 

-सीमा भागातील जनतेच्या लढ्याला बळ द्या – धनंजय मुंडे

-टी.एस.सिंह देव होणार छत्तीसगडचे मुख्यमंत्री???

-मध्यप्रदेश सरकारचा उद्या शपथविधी; अंतर्गत गटबाजी रोखण्यासाठी काँग्रेसचा नवा फॉर्म्यूला?

-“ज्यांनी मला मत दिलेलं नाही त्यांना रडवलं नाही तर माझ नाव अर्चना चिटणीस लावणार नाही”

-या कंपन्यांचं सीम वापरत असाल तर सावधान! पाॅर्न साईट्स बघणं येऊ शकतं अंगलट