आता फक्त ताजमहल बांधून देण्याचं आश्वासन देणं बाकी राहिलंय- देवेंद्र फडणवीस

धुळे | काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या जाहीरनाम्यात जगातील सर्व आश्वासने देऊन झाली आहेत. आता फक्त प्रत्येकाला ताजमहल बांधून देण्याचं आश्वासन देणं बाकी राहिलं आहे, असा टोला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लगावला आहे.

देवेंद्र फडणवीस यांची धुळे जिल्ह्यातील नेर येथे सभा होत आहे. यावेळी फडणवीसांनी विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला आहे. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसने रविवारी आपला जाहीरनामा प्रकाशित केला. यावरुन मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना टोला लगावला आहे.

पंधरा वर्षाच्या काळात काँग्रेस-राष्ट्रावादी सरकारने शेतकऱ्यांना 20 हजार कोटींची मदत केली. मात्र, पाच वर्षाच्या युतीच्या सरकारने शेतकऱ्यांना 50 हजार कोटींपेक्षा अधिकची मदत केली आहे. आम्ही 50 लाख शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली असून अजून ती सुरुच आहे, असं फडणवीस म्हणाले आहेत.

दरम्यान, विधानसभा निवडणुका काही दिवसांवर येऊन ठेपल्या आहेत. त्यामुळे काही दिवस राजकीय पक्षांकडून आरोप-प्रत्यारोपांचे बाण सुटताना दिसणार आहेत.

महत्त्वाच्या बातम्या-