पुणे महाराष्ट्र

पवारांनी बंद पडलेल्या गाडीसाठी भाड्याचे इंजिन आणले- देवेंद्र फडणवीस

पुणे | पवारांची बंद पडलेली गाडी पुढे नेण्यासाठी भाड्याचे इंजिन आणण्यात आले आहे. मात्र ते इंजिन चित्रातले आहे, असं म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका केली आहे.

बारामती लोकसभा मतदारसंघाच्या महायुतीच्या उमेदवार कांचन कुल यांच्या प्रचारार्थ सासवड येथे सभा आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते.

कधी काळी काही लोक सायकल, रिक्षा भाड्याने घ्यायचे. आता मात्र लोक चक्क रेल्वे इंजिन भाड्याने घेत आहेत, अशी टीका त्यांनी केली आहे.

कॅप्टन पवार आता राखीव खेळाडूच्या भूमिकेत आहेत, असं म्हणत त्यांनी शरद पवारांवर टीकास्त्र सोडले.

महत्त्वाच्या बातम्या

-प्रतिस्पर्धी उमेदवारालाच मागितला नवनीत राणांनी जिंकण्यासाठी आशीर्वाद!

-वंचित बहुजन आघाडीचे बटण दाबले तरी मतदान कमळालाच; सुजात आंबेडकरांचा गंभीर आरोप

-बीडचा निकाल काय लागेल??? डॉ. प्रितम मुंडे आणि धनंजय मुंडे म्हणतात…

-‘या’ काँग्रेसच्या उमेदवारासाठी मुकेश अंबानी निवडणुकीच्या प्रचारात!

-राज ठाकरेंनी कट-पेस्टचं राजकारण करणं सोडून द्यावं- विनोद तावडे

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या