Top News

देवेंद्र फडणवीस म्हणतात… यांच्यात सत्तेची गुर्मी चढलेय!

नागपूर | माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सत्ताधारी शिवसेनेवर पुन्हा तोफ डागली आहे. काही लोकांच्या मनात सत्तेची गुर्मी चढली असून त्यांचा रंग बदलला आहे, असं म्हणत त्यांनी घणाघात केला आहे.

नागपूरमध्ये भाजप कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात फडणवीस बोलत होते. यावेळी त्यांनी शिवसेनेला चांगलेच धारेवर धरले. काही लोकांनी विश्वासघात करुन सत्ता स्थापन केली. आता या लोकांना सत्तेची गुर्मी चढली आहे, अशी टीका त्यांनी केली आहे.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनीही शिवसेनेवर टीका केली. राज्यात शिवसेना-भाजप एकत्र लढली होती. तसेच जनतेने युतीच्या बाजूने कौल दिला होता. त्यामुळे यात भाजपचा पराभव झाला असं मला वाटत नाही, असं ते म्हणाले आहेत.

शिवसेनेनं मित्रपक्षाची साथ सोडत विरोधकांना जवळ केले. विचारांशी एकप्रकारे विश्वासघात करत काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेससोबत सत्तास्थापन केली. त्यामुळे आपल्याला पराजय नाही तर विश्वासघात मिळाला आहे, असंही गडकरी म्हणाले आहेत.

ट्रेंडिंग बातम्या-

महत्वाच्या बातम्या-

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या