महाराष्ट्र

“आपल्या देशात एक पंतप्रधान होते पण ते मुके होते”

मुंबई |  या देशात एक पंतप्रधान होते पण ते मुके होते, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचं नाव न घेता त्यांच्यावर टीका केली आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी मनमोहन सिंग यांचं नाव न घेता त्यांना मुक्याची उपमा दिली आहे. जर येत्या निवडणुकीत तुम्ही मोदींना मत दिलं नाही तर ते तुमचच नुकसान असेल, असं फडणवीस म्हणाले.

सीएम चषकाच्या कार्यक्रमाप्रसंगी केलेल्या भाषणात मुख्यमंत्री फडणवीसांनी विरोधकांचा खरपूस समाचार घेतला. काँग्रेसवर त्यांनी सडकून टीका केली तर महाआघाडीचीही त्यांनी खिल्ली उडवली.

दरम्यान, जर महाआघाडीची सत्ता आली तर त्यांच्याकडे पंतप्रधानपदाला उमेदवार नाही, त्यांना दररोज पंतप्रधान बदलावा लागेल, अशी टीका त्यांनी महाआघाडीवर बोलताना केली.

महत्वाच्या बातम्या-

पंतप्रधान मोदींविरोधात राज ठाकरेंचा ममता बॅनर्जींंना पाठिंबा

-कुत्रा-मांजर नव्हे, जंगलाचे राजे आहेत नरेंद्र मोदी- देवेंद्र फडणवीस

ट्रॅकच्या मधोमध थांबले अन् लोकलला साडी अडकल्यानं 3 जीव गेले

-बळीराजाच्या पोरींचं पुणतांब्यात आंदोलन, आजपासून करणार अन्नत्याग

“विरोधी पक्षातील निम्मे आमदार ‘पागल’ होणार”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या