महाराष्ट्र मुंबई

‘नो वन किल्ड जेसिका’ सारखी पूजा चव्हाण प्रकरणाची गत होईल- देवेंद्र फडणवीस

Photo Credit- Facebook/ Devendra Fadanvis, Udhhav Thackarey

मुंबई | राज्यभर पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरण सध्या चर्चेत आहे. या प्रकरणात शिवसेनेचे नेते आणि वन मंत्री संजय राठोड यांचं नाव आल्यानं या प्रकरणाची दखल घेत विरोधी पक्षानेही हे प्रकरण लावून धरलं आहे.

पूजा चव्हाणच्या आत्महत्येला आठवडा उलटून गेला तरी संजय राठोड यांनी माध्यमांसमोर येऊन आपली प्रतिक्रया दिली नाही. याप्रकरणावरून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी  सरकारवर टीकास्त्र सोडलंय.

पूजा चव्हाण प्रकरणात फार काही कारवाई होईल, असं वाटत नाही. नो वन किल्ड जेसिका या सिनेमासारखी या प्रकरणाची परीस्थिती होईल. हे सगळं ठाकरे सरकारच्या आशिर्वादाने सुरु आहे. हे प्रकरण दाबण्याचा सरकार प्रयत्न करत असल्याचं दिसतंय, असा आरोप देवेंद्र फडणवीसांनी यावेळी केला आहे.

दरम्यान, पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात कोणालाही पाठीशी घालण्याचं काही कारण नाही. कोणीही व्यक्ती असूदे जोपर्यंत चौकशी पूर्ण होत नाही तोपर्यंत एखाद्याला त्या पदावरुन हटवणं हे कितपत योग्य आहे? याचा विचार करावा लागेल. संजय राठोड गुरुवारी खुलासा करणार आहेत, असं मला कळलं आहे. त्यांच्यावर आरोप झाले आहेत त्याची सखोल चौकशी झाली पाहिजे, माझं राठोड यांच्याशी याबाबत काही बोलणं झालेलं नाही, असं उपमुख्यमंत्री अजित पवारांनी म्हटलंय.

थोडक्यात बातम्या-

‘ऐकलं नाहीत तर याद राखा’; सुधीर मुनगंटीवारांचा ठाकरे सरकारला इशारा

महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यात संचारबंदी लागू; सर्व शाळा, महाविद्यालये बंद

काळजाचं पाणी करणारा व्हिडीओ, चालू सामन्यात खेळाडूचा मृत्यु

‘पूजा अरूण राठोड’ नावाने यवतमाळ जिल्ह्यात गर्भपाताचा प्रकार!

पुण्यात पुन्हा लाॅकडाऊन होणार का?; मुरलीधर मोहोळ म्हणाले…

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या