Top News महाराष्ट्र मुंबई

देवेंद्र फडणवीसांनी उद्धव ठाकरेंसाठी समर्पित केलं ‘हे’ प्रसिद्ध गाणं!

Photo Credit- Facebook/ Devendra Fadanvis, Udhhav Thackarey

मुंबई | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या मैत्रीचे किस्से अनेक आहेत. युतीचं सरकार असताना देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना दोघांनी मिळून कामे केली. पण 2019 मध्ये झालेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर मुख्यमंत्री पदावरून सेना-भाजपमध्ये वाद निर्माण झाला. त्यानंतर शिवसेनेनं काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत एकत्र येऊन सत्ता स्थापन केली.

देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांच्या मैत्रीतही दरी निर्माण झाल्याची चर्चा आहे. अशात मुंबईत एका कार्यक्रमात बोलताना देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना एक गाणं समर्पित केलं आहे.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि जुने मित्र उद्धव ठाकरे यांना कोणतं गाणं समर्पित कराल?, असा प्रश्न विचारला असता फडणवीसांनी त्यांच्या खास शैलीत उत्तर दिलं.

देवेंद्र फडणवीसांनी ‘दोस्त दोस्त न रहा…’ हे गाणं उद्धव ठाकरेंना समर्पित केलंय. याच कार्यक्रमात देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यादेखील उपस्थित होत्या. त्यांनाही हाच प्रश्न विचारला असता त्यांनी ‘अजिब दास्ता है ये, कहा शुरू कहा खतम…, हे गाणं उद्धव ठाकरे यांना समर्पित केलं.

दरम्यान, यावेळी बोलताना पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणावरून देवेंद्र फडणवीस यांनी सरकारवर टीकास्त्र सोडलं. पूजा चव्हाणने खरंच आत्महत्या केली का? की तिला आत्महत्या करण्यास प्रवृत्त करण्यात आलं?, व्हायरल झालेल्या क्लिप्समध्ये कोणाचा आवाज आहे?, असे अनेक प्रश्न यावेळी देवेंद्र फडणवीसांनी उपस्थित केले.

थोडक्यात बातम्या-

पुण्यातील ‘या’ भागात विद्यार्थ्यांसाठी सरकार 9 मजली भव्य वसतीगृह उभारणार!

‘लिहून घ्या, …त्यानंतर महाराष्ट्रात ऑपरेशन लोटस’; भाजपच्या या आमदाराने सांगितली वेळ!

…म्हणून पुण्यातील कुख्यात गुंड गजानन मारणेला पुन्हा अटक

मुलीनं काही बरं वाईट केलं तर त्याला राष्ट्रवादीचा नेता जबाबदार- तृप्ती देसाई

रिहानाचा ‘हा’ टाॅपलेस फोटो पाहून राम कदम संतापले, म्हणाले…

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या