नवी दिल्ली | व्यंकय्या नायडूंना भाजपने उपराष्ट्रपतीपदासाठी संधी दिल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा राष्ट्रीय राजकारणात प्रवेश होण्याची शक्यता आहे. भाजपच्या संसदीय बोर्डात नायडूंच्या जागी त्यांची वर्णी लागू शकते.
व्यंकय्या नायडूंनी पक्ष सदस्यत्वाचा आणि मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. त्यांच्या संसदीय बोर्डाच्या सदस्यपदाच्या जागी याठिकाणी फडणवीसांच्या नावाची चर्चा आहे.
दरम्यान, संसदीय बोर्ड ही भाजपची राष्ट्रीय स्तरावर निर्णय घेणारी कमिटी आहे.
थोडक्यात बातम्या मिळवण्यासाठी आमचं फेसबुक पेज आत्ताच लाईक करा…
Comments are closed.