Top News

पुण्यातून भाजपनं पक्क ठरवलं ‘एकला चलो रे’? पुण्याच्या सभेत युतीबाबत एक शब्द नाही!

पुणे |  आगामी निवडणुकीत आम्ही सर्वच्या सर्व 48 जागा लढवणार आहोत, असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी पुण्याच्या सभेतून आता भाजपचा ‘एकला चलो रे’ चा नारा असेल, असे संकेत तर दिले नाहीत ना?, अशी चर्चा पुण्यातल्या भाजपा कार्यकर्त्यांच्यात सभेच्या ठिकाणी रंगली आहे.

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या प्रमुख उपस्थितीत आज पुण्यात शक्ती केंद्र संमेलन आयोजित केले होते. यावेळी पक्षाचे सर्व प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

आजच्या पुण्यातल्या सभेत मुख्यमंत्र्यांनी आणि अमित शहांनी आपल्या भाषणात युती विषयी एक चकार शब्दही काढला नाही. दिवसेंदिवस युतीबाबतची शक्यता आता अंधूक होत चाललीये.

दरम्यान, येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातून मला 45 खासदार निवडून द्या, अशी साद अमित शहांनी राज्यातील जनतेला घातली.

 महत्वाच्या बातम्या-

खरंच देवेंद्र फडणवीस बारामतीत पवारांना आणि शिरूरमध्ये आढळरावांना चारी मुंड्या चित करणार?

अखेर पुणतांब्यांतील बळीराजाच्या पोरींचं अन्नत्याग आंदोलन मागे

-“सर्जिकल स्ट्राईक करुन आम्ही पाकिस्तानला त्यांची जागा दाखवून दिली”

-महाराष्ट्रातून यावेळी ’45 खासदार’ निवडून द्या, राज्यातल्या जनतेला अमित शहांची साद

महाराष्ट्रात भाजप पूर्ण ताकदीने 48 जागांवर लढणार- देवेंद्र फडणवीस

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या