महाराष्ट्र मुंबई विधानसभा निवडणूक 2019

…म्हणून काळजीवाहू मुख्यमंत्र्यांनी घेतली राज्यपालांची भेट

मुंबई | सर्वोच्च न्यायालयाने अयोध्या वादग्रस्त प्रकरणाचा आज निकाल दिला आहे. या ऐतिहासिक खटल्याच्या निर्णयानंतर राज्यातील कायदा व सुव्यवस्थेची माहिती देण्यासाठी काळजीवाहू मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपालांची भेट घेतली.

सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आल्यानंतर राज्यात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी खबरदारी घेण्यात येत आहे. अनेक संवेदनशील भागात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. याची माहिती देण्यासाठी फडणवीसांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली.

वादग्रस्त जागा रामलल्लाला बहाल करण्यात आली आहे. तसेच ट्र्स्ट बनवून मंदिर बनवा, असा महत्वपूर्ण निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. सुन्नी वक्फ बोर्डाकडून सुप्रीम कोर्टाच्या या निकालाचं स्वागत करण्यात आलं आहे.

दरम्यान, जातीय तणाव निर्माण केल्यास किंवा भावना भडकवल्यास भारतीय दंड संहिता आणि इतर कायद्यांनुसार कारवाई करण्यात येणार आहे. त्यामुळे सुचनांचे पालन करुन नागरिकांनी सहकार्य करावे, असं आवाहन पोलिसांनी केलं आहे.

महत्त्वात्या बातम्या-

 

 

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या