बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“शिवसेनेच्या 40 आमदारांना मनसेमध्ये घेण्यासाठी फडणवीस-ठाकरे भेट?”

मुंबई | भाजपचे नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांची भेट घेतली. शिवसेनेचे 40 आमदार सध्या भाजपकडे आश्रयीत आहेत. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) त्यांच्या गटालाच खरी शिवसेना म्हणत आहेत. पण हे प्रकरण अजून न्यायालयात प्रलंबित आहे.

या आमदारांना घेऊन एकनाथ शिंदेंना आता त्यांना दुसऱ्या पक्षात जाण्यावाचून गत्यंतर नाही. कारण कायद्याप्रमाणे एखाद्या पक्षातील दोन तृतीअंश आमदार फुटले आणि त्यांनी जर दुसऱ्या पक्षात प्रवेश केला तर त्यांना पक्षांतर बंदीचा कायदा लागू होत नाही. शिंदे गटाला राज ठाकरे यांच्या पक्षात सामावून घेता येईल का? या चर्चेसाठी फडणवीस ठाकरेंना भेटले असावे अशी शंका राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षाला आली आहे.

राष्ट्रवादीचे काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते महेश तपासे (Mahesh Tapase) यांनी ठाकरे आणि फडणवीस भेटीचा मुद्दा उपस्थित केला. एकनाथ शिंदे गटाच्या 40 आमदारांना भाजपमध्ये जायचे नसल्याने त्यांना मनसेमध्ये सामावून घेण्यासंदर्भातील चर्चा ठाकरे आणि फडणवीस यांच्यामध्ये झाली का? अशी शंका तपासे यांनी उपस्थित केली. 105 आमदारांचा पक्ष असलेला नेता 1आमदार असलेल्या पक्षाच्या नेत्याला भेटायला गेला असल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत.

दरम्यान, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हे सर्व प्रश्न फेटाळून लावत, ठाकरे यांच्यावर शस्त्रक्रिया झाल्याने मी त्यांची भेट घेतली. तसे मी यापूर्वी विधीमंडळात जाहीर देखील केले होते. अन्य पक्षातील राजकीय नेत्यांशी संबंध ठेवणे, ही महाराष्ट्राची संस्कृती आहे. मी ठाकरे यांना भेटल्याने कोणालाही मळमळ होण्याचे कारण नाही, असे फडणवीस म्हणाले.

थोडक्यात बातम्या – 

“शरद पवार कधी घरात बसतात आणि मी पार्टी सोडून जातो”

अतिवृष्टी आणि पूरस्थितीमुळे भाज्या महागल्या; दर आणखी वाढण्याची भीती

रानिल विक्रमसिंघे यांनी श्रीलंकेचे अंतरिम राष्ट्रपती म्हणून शपथ घेतली!

मोठी बातमी! प्रसिद्ध अभिनेता दिग्दर्शकाचा राहत्या घरी आढळला मृतदेह

सुष्मिता डेट करत असलेल्या ललित मोदीची संपत्ती आली समोर; वाचून तुमचेही डोळे होतील पांढरे

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More