नागपूर महाराष्ट्र

नाणार लादणार नाही, सर्वांच्या संमतीने निर्णय घेेऊ- मुख्यमंत्री

नागपूर | नाणार प्रकल्प पर्यावरणपुरक आणि महत्वाचा असला तरी नागरिकांचा विरोध डावलून तो प्रकल्प मी त्यांच्यावर लादणार नाही, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं आहे. ते विधानसभेत बोलत होते.

शिवसेना आणि नाणारवासियांकडून विरोध होत आहे आणि सध्या विधानसभेत नाणार प्रकल्पाबाबत निषेधार्थ घोषणाबाजी होत आहे. त्यावर मुख्यमंत्र्यांनी सर्वांशी चर्चा करुन नाणारचा निर्णय घेतला जाईल, असं सांगितलं.

दरम्यान, हा ग्रीन रिफायनरी प्रकल्प असल्यामुळे याचा जनतेला कुठलाही त्रास होणार नाही, असंही ते यावेळी म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या–

-धनंजय मुंडेंना माझ्यामुळेच विरोधी पक्षनेतेपद- पंकजा मुंडे

-…तर मी इथेच विष घेऊन आत्महत्या करेन- सुनील तटकरे

-सहावीच्या पुस्तकात गुजराती मजकूर; विरोधकांचा मोठा गदारोळ

-भाजप युवा मोर्चा उपाध्यक्षाकडून जितेंद्र आव्हाडांना भगवद्गीता भेट!

-…तर भाजपला गंभीर परिणाम भोगावे लागतील- मेहबूबा मुफ्ती

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या