बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

माझ्यापेक्षा माझ्या बायकोला पगार जास्त आहे- देवेंद्र फडणवीस

मुंबई |   राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि सध्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी लिहिलेल्या ‘अर्थसंकल्प सोप्या भाषेत’ या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. या सोहळ्याला सर्वपक्षीय नेत्यांची उपस्थिती होती. यावेळी केलेल्या भाषणात फडणवीसांनी माझ्यापेक्षा माझ्या बायकोला पगार जास्त आहे असं मिश्किलपणे सांगितलं आणि उपस्थितांमध्ये हशा पिकवला.

राज्याचं बजेट आणि आपल्या घरचं बजेट यात जास्त काही फरक नसतो. एवढंच की राज्याचं बजेट जरा व्यापकं असतं. आपण जेव्हा घरचं बजेट तयार करतो तेव्हा सगळ्यांच्या पगाराचा विचार करतो. आता माझ्यापेक्षा आमच्या घरात माझ्या बायकोला पगार जास्त आहे, असं फडणवीस म्हणताच उपस्थितांमध्ये हास्याचा स्फोट झाला.

2005 मध्ये अर्थसंकल्प म्हणजे नेमकं काय? हे पुस्तक लिहिलं होतं. त्यानंतर बरेच बदल झाले. अर्थसंकल्पाशी निगडीत कायदेही बदलले. त्यामुळे नव्या संकल्पनांसहीत हे पुस्तक लिहिलं आहे. हे पुस्तक पीएचडी करणाऱ्यांसाठी नसून सर्वसामान्य लोकांनाही अर्थसंकल्प कळावा या हेतूने लिहिलं आहे. पुस्तक लिहितानाच ते 40 मिनिटांत वाचून होईल 45 मिनिटं लागताच कामा नये, हा हेतू ठेवूनच लिहिलं असल्याचं फडणवीस म्हणाले.

दरम्यान, फडणवीसांच्या पुस्तक प्रकाशनाला सर्वपक्षीय नेत्यांनी हजेरी लावली होती. या नेत्यांनी तुफान फटकेबाजी करत फडणवीसांवर मिश्किल कोट्या केल्या.

ट्रेंडिंग बातम्या-

काय साहेब?, लोक मुर्ख वाटले का?; विशाल दादलानीने भाजपला फटकारलं

“गळ्याची आण खरं सांगतो; …तर मुनगंटीवारांना सगळ्यात जास्त आनंद होईल”

महत्वाच्या बातम्या-

पुढची 5-10 वर्ष अशीच आमच्या अर्थसंकल्पावर पुस्तकं लिहित राहा- उद्धव ठाकरे

काय साहेब?, लोक मुर्ख वाटले का?; विशाल दादलानीने भाजपला फटकारलं

रानू मंडलच्या नशिबी पुन्हा आले पूर्वीचेच दिवस

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More