बीडच्या घटनेत थेट नेत्यांचा हात?, फडणवीसांचा सर्वात मोठा गौप्यस्फोट

मुंबई | मराठा आंदोलनादरम्यान बीडमध्ये अघटित घटना घडल्या. आमदारांच्या घरांची जाळपोळ करण्यात आली तसेच कार्यालयं देखील जाळण्यात आली.

गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकाराची गंभीर दखल घेतली आहे. त्यांनी या प्रकारात सहभागी लोकांना सज्जड इशारा दिला आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी या हिंसाचारामागे काही पक्षाचे नेते तसेच कार्यकर्ते असल्याचा अत्यंत धक्कादायक दावा केला आहे. याचा अर्थ मराठा आरक्षण आंदोलनाच्या आडून कोणते तरी नेते, त्यांचे कार्यकर्ते तसेच काही पक्ष हे आंदोलन हिंसक करण्याचा प्रयत्न करत आहेत का?, असा सवाल निर्माण झाला आहे.

काही लोक या आंदोलनाचा फायदा घेऊन हिंसा करण्याचा प्रयत्न करत आहेत. विशेषतः काल बीडमध्ये काही लोकांनी लोकप्रतिनिधींची घरं जाळली.

काही समाजाच्या लोकांना टार्गेट करण्यात आलं. काही प्रतिष्ठित लोकांची हॉटेल्स तसेच दवाखाने जाळण्यात आले. ही अतिशय गंभीर बाब आहे आणि गृहखात्यानं या प्रकाराची गंभीर दखल घेतलीय आहे. दोषींवर कडक कारवाई केली जाणार आहे, असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आहे.

नेते कार्यकर्त्यांबद्दल काय म्हणाले फडणवीस?

बीडमध्ये जो प्रकार घडला त्याचे सारे व्हिडीओ पोलिसांच्या हाती लागले आहेत. 50-55 लोकांची ओळख पटली आहे, त्यांच्यावर कडक कारवाई केली जाणार आहे. मात्र या घटना घडत असताना काही राजकीय पक्षांचे नेते तसेच कार्यकर्ते त्यात सहभागी होते.

पोलिसांकडे त्याचे व्हिडीओ आहेत, मात्र तपासणीनंतर खात्री होईल, त्यानंतर त्यासंदर्भात अधिक माहिती देवू, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या या वक्तव्यानंतर ते नेते कोण, कुठल्या पक्षाचे अशा चर्चा आता रंगू लागल्या आहेत.

महत्त्वाच्या बातम्या-

Join WhatsApp

Join Now

अधिक चांगल्या अनुभवासाठी ही बातमी Chrome मध्ये उघडा! आपण सध्या Facebook च्या ब्राउझरमध्ये हे पेज पाहत आहात. कृपया वरच्या उजव्या कोपऱ्यातील तीन बिंदूंवर क्लिक करून Open in external browser पर्याय निवडा .