राज ठाकरेंना कुणीही सिरीयस घेत नाही – देवेंद्र फडणवीस

राज ठाकरेंना कुणीही सिरीयस घेत नाही – देवेंद्र फडणवीस

मुंबई | राज ठाकरेंना कुणीही सिरीयस घेत नाही, त्यामुळे तुम्हीही घेऊ नका, असं मिश्किल वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. ते मुंबईत आयोजित लोकमतच्या कार्यक्रमात बोलत होते.

राज ठाकरे माझे चांगले मित्र आहेत. पण प्रतिक्रिया देण्यापलिकडे दुसरं काम त्यांच्याकडे उरलेलं नाही, अशा शब्दांत राज ठाकरेंवर त्यांनी टीका केली आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राहुल गांधींचे तीन राज्यांच्या विजयाबद्दल कौतुक आणि अभिनंदन देखील केले आहे. तसेच देशामध्ये सक्षम विरोधी पक्ष हवा, आणि ते काम राहुल गांधींना पुढील 10 वर्षे करायचं आहे, असा टोला देखील त्यांनी राहुल गांधींना लगावला.

दरम्यान, अहंकार हे पराभवाचं कारण नाही. आम्ही जमिनीशी जोडलेली माणसं आहोत, असं पाच राज्यांच्या पराभवावर बोलताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले. 

महत्वाच्या बातम्या 

टी.एस.सिंह देव होणार छत्तीसगडचे मुख्यमंत्री???

-मध्यप्रदेश सरकारचा उद्या शपथविधी; अंतर्गत गटबाजी रोखण्यासाठी काँग्रेसचा नवा फॉर्म्यूला?

-“ज्यांनी मला मत दिलेलं नाही त्यांना रडवलं नाही तर माझ नाव अर्चना चिटणीस लावणार नाही”

-या कंपन्यांचं सीम वापरत असाल तर सावधान! पाॅर्न साईट्स बघणं येऊ शकतं अंगलट

-अशोक गेहलोत होणार राजस्थानचे मुख्यमंत्री???

Google+ Linkedin