बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

आमचा चौथा उमेदवार आरामात निवडून येईल; फडणवीसांनी महाविकास आघाडीला ललकारलं

मुंबई |   आमच्याकडे पुरेसं संख्याबळ आहे. त्यामुळे आम्ही चौथा उमेदवार देखील आरामात निवडून आणणार, अशं वक्तव्य विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. ते एका मराठी वृत्तवाहिनीशी बोलत होते.

भाजपकडे चौथी जागा निवडून आणण्यासाठी जे संख्याबळ आवश्यक आहे ते संख्याबळ आहे. त्यामुळे आमची चौथी जागा निवडून येण्यात काहीही अडचण येणार नाही, असं फडणवीस म्हणाले आहेत.

येत्या 21 मे रोजी विधानपरिषदेच्या 9 जागांसाठी मतदान पार पडत आहे. भाजपचे तीन उमेदवार सहजपणे निवडून येऊ शकतात. मात्र चौथा उमेदवारही आम्ही निवडून आणू, असा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला आहे.

9 जागांसाठी होणारी विधानपरिषदेची निवडणूक ही सरळ सरळ भाजप विरूद्ध महाविकास आघाडी अशी होणार आहे. यामध्ये राष्ट्रवादीला 2, शिवसेनेना 2, काँग्रेसला 1, भाजपला 3 जागा मिळू शकतात. तर अखेरच्या नवव्या जागेसाठी मात्र चुरस आहे. याच जागेवर फडणवीसांनी आपला दावा केला आहे.

ट्रेंडिंग बातम्या-

‘अनुजने माझी मान अभिमानाने उंचावली’; शहीद मेजर अनुज सूद यांना अखेरचा निरोप

मुंबईत IPS अधिकाऱ्याला कोरोनाची लागण; राज्यभरात 457 पोलिसांना कोरोना

महत्वाच्या बातम्या-

राज्यातील सर्व दुकाने उघडण्यास मुभा; राज्य सरकारचा मोठा निर्णय

पाहा पुण्यात किती रूग्ण सापडले? तर किती रूग्णांना ठणठणीत होऊन घरी सोडलं…

मुंबईतील सर्व सवलती रद्द; मुंबईकरांच्या बेशिस्तपणामुळे आयुक्तांचा निर्णय

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More