बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“ही परिस्थिती राजकारण करण्याची नाही, त्यासाठी पुष्कळ जागा आहेत”

मुंबई | ही परिस्थिती राजकारण करण्याची नाही. सगळ्यांनी एकत्र येऊन पूरग्रस्तांना मदत करता येईल हे पाहूया, असं म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना सुनावलं आहे. पूरग्रस्तांच्या मदतीची माहिती देण्यासाठी घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

विरोधी पक्षाने या पूरस्थितीवरुन राजकारण करु नये, आपल्याला राजकारण करण्यासाठी पुष्कळ जागा आहे, असंही मुख्यमंत्री पत्रकार परिषदेत म्हणाले आहेत.

पूरग्रस्तांनी घाबरू नये. अनेक राज्यातून बचावकार्याचं पथकं महाराष्ट्रात दाखल झाले आहेत, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली आहे.

दरम्यान, पाऊस नेमका किती मिलीमीटर पडणार हे आपल्याला समजू शकत नाही, तांत्रिकदृष्ट्या पावसाचं प्रमाण सांगितलं जातं. पावसाचे सर्व रेकॉर्ड तुटले आहेत. पाऊस किती पडणार हे सांगण्या इतपत आपलं विज्ञान प्रगत नाही, असंही मुख्यमंत्री म्हणाले आहेत.

महत्वाच्या बातम्या-

-“चंद्रकांत पाटलांना 250 जागांचा अंदाज येतो, पावसाचा येत नाही का???”

-ब्रह्मनाळ दुर्घटनेत 12 जणांचा मृत्यू; मुख्यमंत्र्यांची माहिती

-सरकारने निर्लज्जपणाचा कळस केलाय- अशोक चव्हाण

-महापुरामुळे विधानसभा निवडणूक पुढे ढकला; राज ठाकरे यांची मागणी

-अखेर राज्य सरकारनं तो वादग्रस्त निर्णय बदलला; आता पूरग्रस्तांना मिळणार रोख मदत!

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More