Top News पुणे महाराष्ट्र

वरुण द्या, खालून द्या…, मनात असेल त्यांना सुरक्षा द्या- देवेंद्र फडणवीस

पुणे | राज्य सरकारने विरोधी पक्ष भाजप आणि इतर राजकीय नेत्यांच्या सुरक्षा व्यवस्थेत कपात करण्याचा निर्णय घेतला. त्यासोबतच सरकारने युवा सेनेचे सचिव वरुण देसाई यांना थेट ‘एक्स’ दर्जाची सुरक्षा पुरवण्यात आली आहे. यावरून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी उपरोधिक असा टोला लगावला आहे.

वरुण द्या, खालून द्या, ह्याला द्या, त्याला द्या. तुमच्या मनात असेल त्यांना सुरक्षा द्या, असं  देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

सुरक्षा काढणं आणि ठेवणं याचा आमच्यावर काहीही परिणाम होत नाही. आम्हाला त्याची काही चिंता नाही. आम्ही सुरक्षेविना फिरणारे लोक आहोत. आहे तेवढी सुरक्षा पुरेशी आहे. तीही काढली तरी काही फरक पडत नसल्याचं फडणवीस म्हणाले.

दरम्यान, मी गडचिरोलीला जायचो, सिरोंचाला जायचो. सगळीकडे जायचो. आजही सुरक्षा रक्षकाशिवाय मी संपूर्ण महाराष्ट्रात फिरू शकतो. त्यामुळं आमची काही तक्रार नाही. आक्षेप नसल्याचंही फडणवीस म्हणाले.

थोडक्यात बातम्या-

थोरली CA तर धाकटी युपाएससी उत्तीर्ण, भाजप खासदार ओम बिर्ला यांचं शिक्षण किती?

तानाजी चित्रपटाला एक वर्ष पुर्ण! शौर्य गाथेचा भाग बनणं खूप अभिमानास्पद- शरद केळकर

लसीच्या सुरक्षेबाबत शंका, पंतप्रधानांनी आधी स्वत:ला लस टोचून घ्यावी- राष्ट्रवादी

‘आज मला पाकिस्तानला हरवल्यासारखं वाटलं’; भारतीय संघातील ‘या’ शिलेदाराची प्रतिक्रिया

प्रशासनाच्या नाकर्तेपणामुळे निष्पाप बालकांचा नाहक जीव गेला- देवेंद्र फडणवीस

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या