मुंबई | गेल्या आठवड्यात राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना उत्तराखंड येथे जाण्यासाठी राज्य सरकारनं विमान नाकारल्यावरून राजकारण तापलं होतं. आता यावर माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना आणि सरकारवर टीका केली आहे.
खासगी कामांसाठी राज्यापालच काय तर मुख्यमंत्री सुद्धा सरकारी विमानाचा वापर करु शकणार नाही. राज्यपाल ज्या पदावर आहेत त्या पदाच्या प्रतिष्ठेची जबाबदारी त्यांना सुद्धा कळाली पाहीजे, अशी टीका शिवसेनेने सामनाच्या अग्रलेखातून करण्यात आली. याला उत्तर देत राज्यपालांनी एकही असंवैधनिक कृत्य केलेलं नाही, असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं.
राज्याचं सरकार सगळं काही स्वत:च्या मालकीचं असल्यासारखं वागतंय, अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी सरकारवर केली आहे.
राजभवन सचिवालयाने राज्यपालांच्या दौऱ्याअगोदर राज्यपालांना विमान वापरण्यास परवानगी मिळाली आहे किंवा नाही याची खातरजमा करून घ्यावयास हवी होती. ती खात्री न केल्याने राज्यपालांसारख्या महनीय व्यक्तीचा खोळंबा झाला. याबाबत राज्य शासनाची कुठलीही चूक नाही, असं मुख्यमंत्री कार्यालयाने स्पष्ट केलं आहे.
थोडक्यात बातम्या-
पुन्हा लॉकडाऊनबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचं मोठं वक्तव्य, म्हणाले…
“हिंमत असेल तर पाकिस्तान बांगलादेशमध्ये सत्ता स्थापन करून दाखवा”
“एखाद्या हत्येची आत्महत्या करण्यात हे सरकार माहीर आहे”
भविष्यात शिवसेना देशाचं नेतृत्व करेल- उद्धव ठाकरे
लग्नाआधीच्या प्रेयसीसोबतची ऑडिओ क्लीप पत्नीने ऐकली अन् मग….