Top News

“महाराजांची तुलना कुणाशीही होऊ शकत नाही आणि ती कुणी करूही शकत नाही”

मुंबई | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तुलना छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी केलेल्या पुस्तकावरून मोठा वाद निर्माण झाला होता. भाजपवर विरोधकांनी टीकेची झोड उठवली होती. यासंदर्भात माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

छत्रपती शिवाजी महाराज हे आपल्या सर्वांचे आराध्य दैवत आहेत. त्यांची तुलना कुणाशीही होऊ शकत नाही, असं फडणवीसांनी स्पष्ट केलं आहे. तसेच त्या पुस्तकाचा भाजपशी काहीही संबंध नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

नरेंद्र मोदी हे देशातील एक भक्कम, मजबूत नेतृत्व आहे. त्यांच्या नेतृत्वात भारताचा लौकिक संपूर्ण जगात वाढत आहे. 2014 च्या निवडणुकीत त्यांनी आपल्या निवडणूक प्रचाराची सुरुवात सुद्धा शिवाजी महाराजांचा आशीर्वाद घेऊनच केली होती, असं फडणवीसांनी सांगितलं.

शिवाजी महाराजांच्या मार्गाने आपली वाटचाल असेल, असे मोदी यांनी स्पष्ट केलं होतं. त्यांना महाराजांच्या मार्गावर वाटचाल करण्यापासून कुणीही रोखू शकत नाही, असंही त्यांनी म्हटलं आहे.

ट्रेंडिग बातम्या-

… म्हणून मुख्यमंत्री अरविंद केजरीवालांनी दिल्या रोहित पवारांना शुभेच्छा

राज्यात पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी काँग्रेसने लढवली ‘ही’ नवी शक्कल!

शरद पवार हे ‘जाणता राजा’च आहेत; आव्हाडांच्या वक्तव्याचं सुशीलकुमार शिंदेंकडूनही समर्थन

महत्वाच्या बातम्या-

 

 

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या