Top News

निवडणूक सुरु झालीय; पण निवडणुकीत मजाच येत नाहीय- देवेंद्र फडणवीस

Loading...

धुळे | विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु झाली असून सर्व नेते प्रचाराच्या कार्याला लागले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची धुळे जिल्ह्यातील शिवपूर येथे सभा होत आहे. यावेळी फडणवीसांनी विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला आहे. निवडणूक सुरु झाली आहे, काही दिवसांत मतदान होईल, मात्र निवडणुकीत मजाच येत नाहीय, असा टोला मुख्यमंत्र्यांनी लगावला आहे.

आमचे सर्व पहलवान तेल लावून मैदानात उतरले आहेत. मात्र, समोर दुसरा पहलवानच दिसत नाहीय. काँग्रेस-राष्ट्रवादीचा पायपोस एकमेकांच्या पायात नाही. त्यामुळे सुरुवातीपासूनच ते पराभवाच्या मानसिकतेत आहेत, असं वक्तव्य मुख्यमंत्र्यांनी केलं आहे.

Loading...

पन्नास वर्ष खोटं बोल पण रेटून बोल अशा प्रकारचा कारभार यांनी केला. जनतेचा फायदा करुन देण्याऐवजी यांनी स्व:ताचा फायदा करुन घेतला. केंद्र आणि राज्याच्या सत्तेवर ते एकही भ्रष्टाचाराचा आरोप लावू शकलेले नाहीत, अशी टीकाही त्यांनी केली आहे.

काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या जाहीरनाम्यात जगातील सर्व आश्वासने देऊन झाली आहेत. आता फक्त प्रत्येकाला ताजमहल बांधून देण्याचं आश्वासन देणं बाकी राहिलं आहे, असा टोला मुख्यमंत्र्यांनी लगावला. काँग्रेस-राष्ट्रवादीने रविवारी आपला जाहीरनामा प्रकाशित केला होता.

Loading...

महत्त्वाच्या बातम्या-

 

 

Loading...

 

Loading...
Loading...

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या