बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“नाईट लाईफमुळे श्रीमंतांच्या मुलांची सोय झाली, पण शेतकऱ्यांच्या मुलांचं काय?”

परभणी | विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सरकारच्या नाईट लाईफ योजनेवर टीका केली आहे. श्रीमंतांच्या मुलांच्या नाईटलाईफची काळजी तुम्ही घेतली, आता शेतकऱ्यांच्या मुलांच्या नाईट लाईफची काळजी कधी घेणार, असा सवाल त्यांनी केला आहे. ते परभणीतील कृषी फेस्ट कार्यक्रमात बोलत होते.

नाईट लाईफच्या निर्णयामुळे श्रीमंतांच्या मुलांची चंगळ झाली. पण शेतकऱ्यांची मुलं रात्री-बेरात्री शेतात काम करत असतात. विंचू-किड्यांच्या सानिध्यात ते काम करत असताना. रात्री शेताला पाणी द्यायला जावं लागतं. अशा शेतकऱ्यांच्या मुलांसाठी तुम्ही काय केलं, असं फडणवीस म्हणाले आहेत.

देवेंद्र फडणवीसांनी यावेळी मराठवाडा वाॅटरग्रीड योजनेवरुन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर टीका केली. जाणीवपूर्वक काही टेक्नीकल गोष्टी सांगायच्या, असा या नव्या सरकारचा इरादा आहे, असं ते म्हणाले आहेत.

कोणतेही टेक्नीकल कारणे सांगून मराठवाड्याची वाॅटर ग्रीड योजना थांबवण्याचा प्रयत्न झाला तर तो मराठवाड्यावर अन्याय असेल, असं म्हणत फडणवीसांनी टीका केली आहेे.

ट्रेंडिंग बातम्या-

महाविकास आघाडी सरकारचं लवकरच सीझर होणार- बबनराव लोणीकर

दिल्लीप्रमाणे आता महाराष्ट्रातही मोफत वीज!

महत्वाच्या बातम्या-

काम होत नसलं की बहाणे सांगायचं; फडणवीसांचा अजित पवारांना टोला

पुरोगामी पुण्याला लाज आणणारी घटना; हिंदुत्ववादी संघटनेच्या दबावामुळं तुषार गांधींचा कार्यक्रम रद्द

तुम्ही करा मिशन कमळ… आमच्याकडे हात अन् धनुष्यबाण आहेच; भुजबळांचा टोला

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More