बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“शिवसेनेनं आजही साद दिली, तरी आमचे दार उघडेच”

मुंबई | राज्यात महाविकास आघाडीचं सरकार आलं आहे. सर्वात मोठा पक्ष ठरुन देखील भाजपला राज्यात सत्तास्थापन करता आली नाही. शिवसेनेनं भाजपसोबतची युती तोडली. मात्र शिवसेनेनं आजही साद दिली तर आमचे दार उघडेच आहे, असं माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.

देवेंद्र फडणवीस एबीपी माझा या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते. यावेळी त्यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केलं. शिवसेनेसाठी आमची दारं उघडी आहेत. आम्ही कधीही हाक द्यायला तयार आहोत, मात्र समोरुन प्रतिसाद मिळायला हवा, असंही ते म्हणाले आहेत.

उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सरकारने चांगलं काम करावं. आमच्या सरकारच्या पेक्षाही विकासरेषा उंच न्यावी. आमचं त्यांना निश्चित सहकार्य राहिल, फक्त स्थिगिती देण्याचं काम त्यांनी करू नये, असा टोलाही त्यांनी यावेळी उद्धव ठाकरे यांना लगावला.

दरम्यान, पुढे काय होईल हे सांगता येत नाही. पुन्हा भाजपचं सरकार देखील येऊ शकतं कारण 105 जागा आम्हाला मिळाल्या आहेत, असं सूचक वक्तव्य त्यांनी केलंय.

महत्त्वाच्या बातम्या-

 

 

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More