Top News

सत्तेसाठी अजून किती लाचार होणार आहात?; देवेंद्र फडणवीसांची मुख्यमंत्र्यांवर टीका

मुंबई | माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी सावरकरांविषयी राहुल गांधींनी केलेल्या वक्तव्यावरुन शिवसेनेला लक्ष्य केलं. सत्तेसाठी अजून किती काळ शिवसेना लाचार होणार आहे, असं ते म्हणाले आहेत.

राहुल गांधी यांनी सावरकरांबाबत केलेल्या वक्तव्यावर शिवसेनेची भूमिका काय? सत्तेसाठी किती काळ लाचारी स्वीकारायची हे सेनेनं ठरवावं. शिवसेनेनं आपला बाणा सोडणार आहे काय? सत्तेसाठी आपली भूमिका सोडणार आहात काय? असा सवाल फडणवीसांनी केला आहे.

मी काही राहुल सावरकर नाही, राहुल गांधी आहे. त्यामुळे  मी मरेन पण माफी मागणार नाही, असं वक्तव्य राहुल गांधी यांनी केलं होतं. यावर शिवसेनेनं त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे. आमच्या भूमिकेत कोणताही बदल झालेला नाही, असं सेनेनं म्हटलं आहे.

मंत्रिमंडळाच्या बैठकीत शेतकऱ्यांच्या विषयाची चर्चाच झाली नाही, किमान मुख्यमंत्र्यांनी केलेल्या घोषणेची पूर्तता करावी. नियमित सरकार येऊनही शेतकऱ्यांना अद्याप मदत मिळालेली नाही, अशी टीकाही फडणवीसांनी केली आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

 

 

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या