पिंपरी | पिंपरी चिंचवड शहरात छत्रपती संभाजी महाराजांचा सर्वात मोठा पुतळा उभारणार आहे. त्या पुतळ्याची उंची 140 फूट एवढी असणार आहे. शहरातील सर्व तरूणांना प्रेरणा देणार शिल्प ठरणार असल्याचं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.
पिंपरी-चिंचवडमध्ये भाजप आमदार महेश लांडगे यांनी इंद्रायणी थडी जत्रेचं आयोजन केलं आहे. या जत्रेच उद्घाटन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केलं.
छत्रपती संभाजी महाराजांचे नाव घेतले तरी तरुणांमध्ये एक वेगळी उर्जा येते. या शिल्पाच्या उद्घाटनासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस तुम्ही यावे अशी आमची अपेक्षा असल्याचे आमदार महेश लांडगे यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी सांगत असतात जोपर्यंत महिला सक्षम होणार नाहीत, तोपर्यंत देश प्रगती करू शकत नाही. जगाच्या पाठीवर प्रत्येक देशाकडे आपण जर पाहिले तर त्या देशाने केव्हाच प्रगती साधली आहे, असंही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.
ट्रेंडिंग बातम्या-
काँग्रेसचे नेते सत्तेसाठी लाचार आहेत- राधाकृष्ण विखे पाटील
अजित पवारांना झाली ‘त्या’ शपथविधीची आठवण; म्हणाले…
महत्वाच्या बातम्या-
“राजेंद्र आज असा नटलाय, लग्नात सुद्धा इतका नटला नव्हता”
पुरोगामी महाराष्ट्रात चाललंय तरी काय?; प्रेमी युगलाला मारहाण करत तरूणीचा विनयभंग
“नागरिकत्व कायदा आणून सरकारने महात्मा गांधींची इच्छा पूर्ण केली”
Comments are closed.