बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“मला असं वाटतं मी आजही मुख्यमंत्रीच आहे..”; फडणवीसांच्या वक्तव्यामुळे चर्चेला उधाण

मुंबई | माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस निवडणुकीच्या प्रचार सभांमध्ये ‘मी पुन्हा येईन.. मी पुन्हा येईन’चा वारंवार उच्चार करताना दिसले होते. देवेंद्र फडणवीसांच्या या विधानाची आजही चर्चा होते. मी पुन्हा येईन नंतर देवेंद्र फडणवीसांच्या नव्या वक्तव्यामुळे आता राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे.

देवेंद्र फडणवीस आज मुंबईत होते. त्यांनी महिला मासळी विक्रेता परवाना वितरण समारंभात हजेरी लावली. या कार्यक्रमात ते बोलत होते, मला असं वाटतच नाही की, मी मुख्यमंत्री नाही, असं जाहीर विधान फडणवीसांनी यावेळी बोलताना केलं. देवेंद्र फडणवीसांच्या या विधानामुळे राजकीय वर्तुळात मात्र नव्या चर्चांना तोंड फुटलं आहे.

यावेळी बोलताना देवेंद्र फडणवीसांनी त्यांच्या नेत्यांचं आणि कार्यकर्त्यांचं तोंडभरून केलं. तुमच्यासारख्या नेत्यांमुळे मला जाणवलं नाही की मी मुख्यमंत्री नाही. मला आजही वाटतं की मुख्यमंत्रीच आहे. तुम्ही मला त्याची कमतरता जाणवू दिली नाही, असं म्हणत देवेंद्र फडणवीसांनी त्यांच्या मनातली गोष्ट सांगितली आहे.

मनुष्य कोणत्या पदावर आहे ते महत्त्वाचं नाही. तो काय काम करतो ते महत्त्वाचं आहे. गेले 2 वर्ष एकही दिवस घरात न थांबता मी जनतेच्या सेवेमध्ये आहे त्यामुळे जनतेने मला मी मुख्यमंत्री नसल्याचं कधीच जाणवू दिलं नसल्याचंही फडणवीस म्हणाले. विरोधी पक्षनेता म्हणुन मी उत्तम काम करत आहे, असंही देवेंद्र फडणवीस या कार्यक्रमात बोलताना म्हणाले.

 

 

 

थोडक्यात बातम्या-

महाराष्ट्रात काय पोलीस-पोलीस खेळ सुरू आहे का?, आशिष शेलार संतापले

खून का बदला खूनसे! भारतीयांनी अवघ्या 24 तासांत केला दहशतवाद्यांचा खात्मा

साउथची ‘ही’ प्रसिद्ध अभिनेत्री बनली आई; तब्बल एक वर्षानंतर केला खुलासा

“केंद्रीय मंत्रिमंडळात सर्व दहशतवादी भरले आहेत”

चौकशीदरम्यान अटक झाल्यास युवराज सिंगला जामीनावर सोडा – उच्च न्यायालय

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More