Top News महाराष्ट्र मुंबई

शरद पवार जर पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटणार असतील तर…; फडणवीसांचं मोठं वक्तव्य!

मुंबई | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल रविवारी मेट्रो कारशेड आणि कांजूरमार्गावरून विरोधकांना प्रत्युत्तर दिलं. याच पार्श्वभूमीवर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी हा प्रकल्पाचा मुद्दा राष्ट्रवादीचे सर्वसर्वा शरद पवारांकडे सोपवला आहे.

मेट्रो प्रकल्पात आम्ही भावनिकदृष्ट्या जुडलेलो आहोत. मेट्रो होऊ नये असं कोणाचंच मत नाही. मी स्वत: मेहनत करुन 80 टक्के टनलिंगचं काम त्या काळात पूर्ण केलंय. त्यामुळेच पवारसाहेब जर मोदींशी बोलून यासंदर्भात चर्चा करणार असतील, तर त्यांचं स्वागतच असल्याचं देवेंद्र फडणवीसांनी म्हटलं आहे.

शरद पवार आणि आमचे कितीही वैचारिक मतभेद असले तरी, पवारसाहेब जेव्हा तो अहवाल वाचतील, तेव्हा ते प्रॅक्टीकल निर्णय घेतील, पवारसाहेब कधीही चुकीचा निर्णय करणार नाहीत, असंही फडणवीस म्हणाले.

दरम्यान, आरे शेडमध्ये जे मेट्रो स्टेशन कारायचंय, त्याचही 100 कोटींपेक्षा जास्त काम झालंय. विशेष म्हणजे कांजूरमार्गच्या जागेचा उल्लेख करताना, आत्ता खर्चाचा बोजा पडेलच, शिवाय 2021 मध्ये होणारी मेट्रो 2024 सालापर्यंत मिळणार नसल्याचंही फडणवीसांनी सांगितलं.

थोडक्यात बातम्या-

‘…तर पहिला कडेलोट संजय राऊतांचा केला असता’; निलेश राणेंची जहरी टीका

“उद्धवजी, अजूनही वेळ गेलेली नाही, फडणवीसांना सोबत घेऊन मोदीजींना भेटा

भाजप आमदार राम सातपुतेंच्या लग्नात नेतेमंडळींकडूनच कोरोनाच्या नियमांना केराची टोपली

मेट्रोची कामे दर्जेदार आणि वेळेत पूर्ण करावीत- उद्धव ठाकरे

आरक्षणाचा निर्णय होत नाही तोपर्यंत भरती नको- विनायक मेटे

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या