Devendra Fadanvis | मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना राज्यामध्ये सध्या सर्वाधिक चर्चेत असलेली योजना आहे. या योजनेच्या माध्यमातून विवाहीत, अविवाहित, दुर्बल महिलांना महिन्याला 1500 रूपये देण्यात येणार आहेत. यामुळे आता मुख्यमंत्री लाडकी बहीण यो़जनेवरून आता राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) विरोधकांवर आक्रमक झाले आहेत.
महिला भगिनींकडून अर्ज भरले जात आहेत. यावरून आता सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांविरोधात आले आहेत. तर विरोधक योजनेवरून टीका करताना दिसत आहेत. पुणे य़ेथील बालेवाडी येथे देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) बोलत असताना त्यांनी लाडकी बहीण या योजनेवर बोलत असताना विरोधकांवर गंभीर आरोप केला आहे.
विरोधकांकडून खोटा नॅरेटीव्ह पोहोचवला जातोय
देवेंद्र फडणवीसांनी विरोधकांना लक्ष केलं आहे. राज्य सरकारने विविध योजना राबवल्या आहेत. तसेच समाजातील प्रत्येक घटकांना न्याय दिला आहे. महिला भगिनींसाठी लाडकी बहीण योजनाही आपल्या सरकारने सुरू केल्याचं देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी सांगितलं. मात्र विरोधकांकडून खोटा नॅरेटीव्ह पोहोचवला जात आहे. विशेष म्हणजे हेच या योजनेचा विरोध करताना दिसत आहे. हेच या योजनेसाठी महिलांचे अर्ज भरले जात असल्याचं फडणवीस म्हणाले आहेत.
यांना पुन्हा एकदा सत्तेत येऊन सर्व योजना बंद करायच्या आहेत. आपण लाडकी योजना आणली, मात्र विरोधक किती लबाड आहेत. माझं कार्यकर्त्यांना सांगणं आहे की ही योजना आपली आहे. आपल्याला महिलांचे अर्ज भरून घ्यायचे आहेत आणि ते सरकारला द्यायचे आहेत. ही योजना फसेल यासाठी विरोधकांचा प्रयत्न असल्याचं फडणवीस म्हणाले आहेत.
विरोधकांची रणनीती आहे की महिलांचे अर्ज भरून घ्यायचे आणि ते अर्ज सरकारकडे पाठवायचे नाहीत. ही योजना फसेल यासाठीच हे सर्व चाललं असल्याचं वक्तव्य देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी केलं.
“मी आदेश देतो फुल बॅटिंग करा”
आपली लोकं आदेशाची वाट बघत बसतात. ती उत्तर देत नाहीत. मी आदेश देतो फुल बॅटिंग करा, आदेश विचारू नका, मैदानात उतरा आणि ठोकून काढा फक्त बोलत असताना आपली हिड विकेट पडून देऊ नका, असं क्रिकेटच्या भाषेत देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या कार्यकर्ते आणि नेत्यांना सल्ला दिला आहे.
News Title – Devendra Fadanvis Slam Against Opposite Party Leader About Ladki Bahin Yojana
महत्त्वाच्या बातम्या
ऐश्वर्या-अभिषेकच्या घटस्फोटाची चर्चा, तो मित्र ठरतोय तिसरा व्यक्ती?
“मी अजित पवार, महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतो की…”
नागपुरात पावसाचा कहर! गावांना पाण्याचा वेढा, शहरात वीजपुरवठा खंडित; नागरिकांचे हालच हाल
गुजरातमध्ये शाळेची भिंत कोसळली, मुलं पहिल्या मजल्यावरून थेट..; घटनेचा थरारक VIDEO व्हायरल
“UPSC सारख्या प्रक्रियेत गडबड म्हटल्यावर..”; पूजा खेडकर प्रकरणी प्रियंका गांधी संतापल्या