बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

छोटी राज्यपण तुमच्यासारखी जीएसटीसाठी रडत नाहीत; फडणवीसांचा मुख्यमंत्र्यांवर निशाणा

मुंबई |  कोरोनाच्या संकटामुळे केवळ महाराष्ट्रच नव्हे तर देशातील इतर राज्यांची जीएसटीची भरपाई थकली आहे. मात्र, तरीही अगदी लहान राज्यंही त्यासाठी तुमच्याप्रमाणे रडत बसलेली नाहीत, असा टोला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारला लगावला आहे.

फडणवीसांनी महाविकास आघाडी सरकारकडून जीएसटी थकबाकीविषयी करण्यात आलेल्या आरोपांना प्रत्युत्तर दिले. जीएसटीची भरपाई ही केंद्र सरकारने देणे अपेक्षित नाही. ही भरपाई जीएसटी कौन्सिलच्या फंडातून देण्यात येते. मात्र, आता या फंडातील रक्कम संपल्यामुळे जीएसटीची भरपाई देणे शक्य नाही, असं ते म्हणाले.

एकट्या महाराष्ट्राची जीएसटीची रक्कम थकलेली नाही. महाराष्ट्रापेक्षा आणखी कितीतरी राज्यांचे जास्त पैसे थकलेले नाहीत. मात्र, त्या राज्यांच्या अर्थमंत्र्यांना ही बाब माहिती आहे. त्यामुळे ते जीएसटीच्या पैशासाठी रडत न बसता लढत आहेत, असं ते म्हणाले.

राज्य सरकार कोरोना परिस्थिती हाताळण्यात आलेले अपयश लपवण्यासाठी दररोज नवनवे मुद्दे उकरून काढत आहे. हे एकप्रकारचे कव्हरिंग फायर आहे, अशी टीकाही त्यांनी ठाकरे सरकारवर केली.

ट्रेंडिंग बातम्या-

शाळा सुरू करण्यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचं मोठं वक्तव्य, म्हणाले…

“इतकं वाटत असेल तर स्वत: येऊन परिस्थिती सांभाळा”

महत्वाच्या बातम्या-

सरकार भूमिका घेईल असं वाटत नाही, आता नातेवाईक मित्रमंडळींना भेटायला सुरू करा- आंबेडकर

अक्षय बोऱ्हाडे मारहाण प्रकरण : अखेर सत्यशील शेरकर यांच्यावर गुन्हा दाखल

आगामी काळात कृषी विभागासाठी लॉकडाउन नसणार आहे- दादा भुसे

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More