मुंबई | माजी मुख्यमंत्री आणि सध्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या अडचणी वाढल्या आहेत. कारण सर्वोच्च न्यायालयाने देवेंद्र फडणवीसांची पुनर्विचार याचिका फेटाळली आहे. त्यामुळे फडणवीस यांच्याविरोधात आता खटला चालणार आहे.
2014 साली विधानसभा निवडणुकीसाठी प्रतिज्ञापत्र सादर करताना फडणवीसांनी त्यांच्यावरील दोन फौजदारी गुन्हे लपवल्याचा आरोप आहे. फडणवीस यांनी यासंबंधी सर्वोच्च न्यायालयात पूनर्विचार याचिका दाखल केली होती. मात्र, न्यायालयाने याचिका फेटाळून लावल्याने फडणवीसांचं टेंशन वाढणार आहे.
देवेंद्र फडणवीस हे 20 फेब्रुवारीला नागपुरातील JMFC न्यायालयात सुनावणीसाठी न्यायालयात हजर राहिले होते. न्यायालयाने फडणवीसांना 15 हजाराच्या वैयक्तीक जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला होता.
दरम्यान, सतीश उके यांनी दाखल केलेल्या याचिकेनुसार देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधातील बदनामी आणि फसवणूक असे दोन गुन्हे नागपूरमधील आहेत. फडणवीसांनी प्रतिज्ञापत्रात गुन्हे लपवले आहेत, त्यामुळे त्यांची आमदारकी रद्द करावी, अशी मागणी याचिकेत करण्यात आली आहे.
ट्रेंडिंग बातम्या-
पवारांचा धसका घेऊन मोदींनी ‘तो’ निर्णय घेतला असावा; भाजप आमदाराची टोलेबाजी
विवाहबाह्य संबंध उघड झाल्यानं सुनेनं खोटे आरोप केले- विद्या चव्हाण
महत्वाच्या बातम्या-
भाजप नेता म्हणतो, 5 कोटी असतील तरच सभापतीसाठी लढा!
“मुस्लिम आरक्षणाबाबत महाविकास आघाडीत कोणताही निर्णय झाला नाही”
माझ्यासाठी पहिल्यांदा देश नंतर पक्ष; पंतप्रधान मोदींचे प्रतिपादन
Comments are closed.