Devendra Fadanvis | मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी आहे. तर देशाची अर्थिक राजधानी आहे. मुंबई मिळवण्यासाठी सत्ताधाऱ्यांकडून अनेक प्रयत्न होताना दिसत असल्याचं विरोधकांचं म्हणणं आहे. मुंबईतून अनेक उद्योगधंदे हे गुजरातला नेल्याचा आरोप हा उद्धव ठाकरे यांच्याकडून करण्यात येत आहे. दरम्यान आता मुंबई ही कोणाची या प्रश्नावर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) थेट बोलले असल्याचं चित्र पाहायला मिळालं आहे. माध्यमांसोबत मुलाखतीत बोलत असताना विचारलेल्या प्रश्नांची फडणवीस यांनी उत्तरं दिली आहेत.
मुंबई कोणाचा बालेकिल्ला?
माध्यमांसोबत मुलाखतीत बोलत असताना देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी थेट उत्तर दिलं आहे. फडणवीस यांना मुंबई कोणाची असं विचारण्यात आलं त्यावर फडणवीस म्हणाले की, मुंबई ही बाळासाहेब ठाकरे आणि भाजपची आहे असं त्यांनी उत्तर दिलं आहे.
ते पुढे म्हणाले की, 2014 रोजी मुंबईमध्ये आम्ही पहिल्यांदा वेगवेगळे लढलो. तेव्हा आमच्या 15 आणि त्यांच्या 14 जागा आल्या होत्या. जेव्हा मुंबई महापालिकेत आम्ही लढलो होतो तेव्हा त्यांच्या 34 आणि आमच्या 32 जागा आल्याचं फडणवीस (Devendra Fadanvis) म्हणाले आहेत.
“मुंबई हा उद्धव ठाकरे यांचा बालेकिल्ला नाही”
त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी (Devendra Fadanvis) यांना उद्धव ठाकरे यांचा बालेकिल्ला असणाऱ्या मुंबईमध्ये का यावं लागतं? असा सवाल करण्यात आला होता. तेव्हा देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई हा उद्धव ठाकरे यांचा बालेकिल्ला नाही. मुंबईने महायुतीला अधिकाधिक साथ दिली आहे. मुंबईकरांचं मोदींवर प्रेम असल्याचं देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.
मुंबईकरांच्या मनामध्ये मोदी आहेत म्हणून त्यांनी मुंबईमध्ये येत रोडशो केला होता. मुंबईकरांच्या मनामध्ये मोदी आहेत. म्हणून मोदी वारंवार मुंबईमध्ये येताना दिसत आहेत. मुंबईत मोदींचं आकर्षण आहे. ज्यांचं आकर्षण आहे. त्यांना बोलवलं जातं, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत. मोदी नसतील तर आम्ही एकनाथ शिंदे यांना बोलवतो. एकनाथ शिंदे यांच्या सभा या उद्धव ठाकरे यांच्यापेक्षा मोठ्या होताना दिसत आहेत.
मोदींनी घाटकोपरमध्ये रोडशो केला. त्याच ठिकाणी ते होर्डिंग पडलं. त्यावर उद्धव ठाकरे यांनी संवेदना राहिल्या नसल्याची टीका केली. त्यावर फडणवीस यांनी पलटवार करत कडक शब्दात सुनावलं. ज्यांचं होर्डिंग पडलं तो त्यांचा माणूस आहे. त्यांच्या काळात होर्डिंग लावण्याची परवानगी यांनी दिली. त्या माणसाचे आणि उद्धव ठाकरे यांचे फोटो व्हायरल होताना दिसत आहेत. लोकांचा जीव गेलाय. हा सदोष मनुष्यवध आहे. हे आम्हाला संवेदना शिकवत आहेत. त्यांच्या सभा बंद झाल्या का? प्रचार बंद झाल्या का? हे आम्हाला संवेदना शिकवत असल्याचं देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.
News Title – Devendra Fadanvis Talk About Mumbai And Uddhav Thackeray
महत्त्वाच्या बातम्या
अजित पवारांचं टेन्शन वाढलं, बारामतीत पुन्हा एकदा पवार विरूद्ध पवार होणार लढत?
मोठी बातमी! ‘या’ तारखेला लागणार बारावीच्या निकाल?; बोर्डाकडून महत्वाची अपडेट
“माझ्याकडून काही चुका…”; मुलगा सैफबद्दल असं का म्हणाल्या शर्मिला टागोर?
राखीची तब्येत नाजूक, ‘या’ आजाराशी करतेय सामना?; एक्स नवऱ्याकडून खुलासा
“ईडीने जप्त केलेले पैसे मी गोरगरिबांना देणार”, नरेंद्र मोदींचं मोठं वक्तव्य