Top News महाराष्ट्र रायगड

“पवारांचा कृषी कायद्यांच्या मूलतत्त्वांना विरोध नाही काही जण वाहत्या गंगेत हात धुताहेत”

रायगड | कृषी कायद्याविरोधात शेतकऱ्यांनी दिल्लीत जाऊन आंदोलन केलं आहे. राज्यातूनही काँग्रेस आणि शिवसेनेने जाहीरपणे या शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठींबा दिला आहे. याच पार्श्वभूमीवर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर निशाणा साधला आहे.

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार कृषीमंत्री असताना टास्क फोर्सने दिलेल्या सूचनांच्या आधारे हे कायदे करण्यात आले आहेत. त्यांनी कृषी कायद्यांच्या मूळ तत्वांना विरोध केलेला नाही. ते यावर बोलत नाहीत पण वाहत्या गंगेत अनेक जण हात धुत असल्याचं देवेंद्र फडणवीसांनी म्हटलं आहे.

महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्यांनी ट्रॅक्टर चालवण्याशिवाय केलं नाही. काही जण समजून घेऊनही झोपल्याचं सोंग करुन शेतकऱ्यांच्या फायद्याच्या कायद्यांना विरोध करत असल्याचंही फडणवीस म्हणाले.

दरम्यान, शेतकरी आंदोलकांमध्येही काही गट असून त्यांना आंदोलन सुरु ठेवायचं आहे. त्यांना आंदोलनावर तोडगा काढायचा नसल्याचा आरोप फडणवीसांनी यावेळी बोलताना केला आहे.

महत्वाच्या बातम्या-

“भाजपसोबत राहिलो असतो तर मुख्यमंत्री असतो, काँग्रेसमुळे सगळं संपलं”

“ज्या तख्तावर तुम्ही बसले आहात ते तख्त शेतकरी बदलून टाकतील”

भाजपच्या ‘या’ नेत्याने केला काँग्रेसमध्ये प्रवेश, अशोक चव्हाणांच्या उपस्थितीत केला प्रवेश

“दम असेल कर अटक करा, शेतकऱ्यांसाठी फाशी द्यायची झाली तरी द्या”

‘..तर मीपण राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार परत करणार’; विजेंदर सिंगचाही शेतकरी आंदोलनाला पाठींबा

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या